चंद्रपूर : पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्यासोबत झालेल्या संवादाच्या चित्रफितीमुळे राज्यात लोकप्रिय झालेल्या पोंभूर्णा तालुक्यातील डोंगर हळदी येथील ध्येयव्येडा सोहम उईके याची ऑफ्रोट फाऊंडेशन दखल घेतली असून त्याच्या पुढील शिक्षणासाठी ५० हजार रुपयांची मुदत ठेव करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सोहमला कार्यालयात बोलावून त्याचा सत्कार केला होता. सोहम जि.प. प्राथमिक शाळेत ८ व्या वर्गात शिकत असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी आणि एखाद्या गोष्टीची ओढ या बळावर आपण कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. खरी संपती धन नसून ज्ञान आहे व ती शिक्षणामुळेच मिळवू शकतो, हा दृढ आत्मविश्वास शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे.

हेही वाचा >>> पक्षाने संधी दिल्यास वर्ध्यातून लोकसभा लढणार-सुप्रिया सुळे

ध्येयवेड्या सोहमच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचण येऊ नये याकरिता ऑफ्रोट फाऊंडेशनचे संचालक ॲड. राजेंद्र मरसकोल्हे, नंदकिशोर कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहन याच्या पुढील शिक्षणाकरिता पन्नास हजाराची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्ष विजय कुमरे, सचिव शंकर मडावी, सुनील गेडाम, पुरुषोत्तम सिडाम यांच्या हस्ते सोहम व त्याच्या पालकांकडे २५ हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. दुसरा धनादेश वर्ग १० वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहे.