लोकसत्ता टीम

नागपूर: रेल्वेने प्रवास करताना सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने गेल्या वर्षभरात धावत्या रेल्वेगाडीतून पडून ५२ आणि रेल्वे रुळ ओलांडताना ५३ जणांनी जीव गमावला. रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो. त्यामुळे रेल्वेतून प्रवासाला प्राधान्य दिले जाते. पण, अनेकदा सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष होते. रेल्वे प्रवास करताना धावत्या गाडीतून पडून राज्यात गेल्या वर्षभरात (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ ) ५२ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर रुळ ओलांडताना वर्षभरात ५३ जण ठार झाले, असा तपशील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना प्राप्त झाला आहे.

vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
census delay by Modi government due to low fund provision
जनगणना आणखी लांबणीवर? १२ हजार कोटींची गरज असताना केवळ ५७५ कोटींची तरतूद
western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
Jalgaon train accident marathi news
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठांचे पथक
Nepal citizens died , Jalgaon train accident, Jalgaon ,
जळगाव रेल्वे दुर्घटनेत नेपाळी नागरिकांचा मृत्यू
Jalgaon train accident 12 deaths
Jalgaon Train Accident : अफवेमुळे रुळावर उड्या, जळगावजवळच्या रेल्वे अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू
Jalgaon Railway Accident| Pushpak Pushpak Train Accident Latest Updates
Jalgaon Railway Accident : “…म्हणून ११ प्रवासी ठार झाले”, माजी खासदार उन्मेष पाटील यांनी काय सांगितलं?

अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ कालावधीत वेगवेगळ्या रेल्वेगाडीतून पडून आणि रेल्वे रुळ ओलंडताना १०५ जणांचा मृत्यू झाला. तसेच चालू वर्षात (१ जानेवारी २०२३ ते मार्च अखेर) रेल्वेगाडीतून पडून १५ प्रवाशांचा तर रुळ ओलांडताना १२ जणांचा बळी गेला.

आणखी वाचा-मस्तच! भारत गौरव पर्यटन रेल्वे नागपूरमार्गे धावणार, ७ रात्र, ८ दिवस आणि शुल्क मात्र…

प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्याप्रमाणात रेल्वेगाड्यांची संख्या वाढत नाही. दुसरीकडे केंद्र सरकार शयनयान (स्लीपर क्लास) डब्यांना महत्व देत नाही. त्याऐवजी वातानुकूलित डब्यांची संख्या वाढवण्यात येत आहे. सर्वसाधारण आणि स्लीपर क्लासमधून गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवास करतात. परंतु, स्लीपरच्या तीनपट भाडे वातानुकूलित डब्यांचे असते. त्यामुळे सर्वसाधारण आणि शयनयान डबे कायमच भरलेले असतात. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना किंवा दंड आकारलेल्यांना शयनयान डब्यातून प्रवास करण्याची मुभा दिली जाते. परिणामी, आरक्षित तिकीट असलेल्यांच्या शयनयान डब्यात देखील मोठी गर्दी होते. प्रत्येक गाडीला एक किंवा दोन सर्वसाधारण डबे असतात. या डब्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जीवघेण्या गर्दीमुळे धावत्या गाडीतून पडण्याचे प्रकार देखील घडले आहेत, असे भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला यांनी सांगितले.

Story img Loader