नागपूर : रेल्वेने प्रवास करताना सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने गेल्या वर्षभरात राज्यात धावत्या रेल्वेगाडय़ांमधून पडून ५२ आणि रेल्वे रूळ ओलांडताना ५३ जणांनी जीव गमावला. रेल्वे प्रवास करताना धावत्या गाडीतून पडून राज्यात गेल्या वर्षभरात (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२) ५२ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर रूळ ओलांडताना वर्षभरात ५३ जण ठार झाले, असा तपशील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना प्राप्त झाला आहे.

अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ कालावधीत वेगवेगळय़ा रेल्वेगाडय़ांतून पडून आणि रेल्वे रूळ ओलांडताना १०५ जणांचा मृत्यू झाला. तसेच चालू वर्षांत (१ जानेवारी २०२३ ते मार्चअखेर) रेल्वेगाडीतून पडून १५ प्रवाशांचा, तर रूळ ओलांडताना १२ जणांचा बळी गेला.  दरम्यान,  सर्वसाधारण आणि स्लीपर क्लासमधून गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवास करतात; परंतु स्लीपरच्या तीनपट भाडे वातानुकूलित डब्यांचे असते. त्यामुळे सर्वसाधारण आणि शयनयान डबे कायमच भरलेले असतात. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना किंवा दंड आकारलेल्यांना शयनयान डब्यातून प्रवास करण्याची मुभा दिली जाते. परिणामी, आरक्षित तिकीट असलेल्यांच्या शयनयान डब्यातदेखील मोठी गर्दी होते. प्रत्येक गाडीला एक किंवा दोन सर्वसाधारण डबे असतात. या डब्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जीवघेण्या गर्दीमुळे धावत्या गाडीतून पडण्याचे प्रकारदेखील घडले आहेत, असे भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला यांनी सांगितले.

1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Indian Railways Compensation for Death| Compensation for Natural Death in Trains
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई मिळते का? काय आहेत रेल्वेचे नियम?
Nagpur murder news
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
high court order railway administration
गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू, पालकांना चार लाख रुपये नुकसाभरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Tirupati stampede
Tirupati stampede : तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू
Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच
Story img Loader