नागपूर : नागपूर विभागातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ५२ टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचे व्यसन असून त्यापैकी १५ टक्के विद्यार्थ्यांना यामुळे मूख कर्करोग झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे.

शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर आणि इंडियन डेंटल असोसिएशन, नागपूर आणि अतिरिक्त आदिवासी आयुक्त, कार्यालय नागपूर यांच्या संयुक्तविद्यमाने तपासणी करण्यात आली. या अहवालाचे प्रकाशन रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या तपासणी प्रकल्पासाठी अतिरिक्त आदिवासी आयुक्त विभागाच्या अखत्यारितील ९ प्रकल्प कार्यालयांच्या १९१ शासकीय आश्रम शाळा आणि वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या एकूण २३ हजार ८० विद्यार्थ्यांची कर्करोगाची तपासणी करण्यात आली. त्यात ५२ टक्के विद्यार्थी तंबाखूचे सेवन करणारे होते आणि त्यापैकी १५ टक्के विद्यार्थ्यांना मुख कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले. मूख कर्करोग असलेल्या मुलांवर नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये उपचार केले जाणार आहे.

Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
Shah Rukh Khan quits smoking at the age 59
शाहरुख खानने वयाच्या ५९ व्या वर्षी सोडले धूम्रपान; जाणून घ्या धूम्रपान सोडण्याचे फायदे
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय

हेही वाचा – गोंदिया : वाघाची शिकार, ११ आरोपींना अटक

दरम्यान फडण‌वीस यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले. एक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांव्दारे तोंडावाटे होणाऱ्या कर्करोगाचा लवकर शोध घेण्यासाठी एक यंत्रणा तयार केली जाईल. त्यासाठी सरकारी दंत महाविद्यालय, नागौर, विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आणि अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नागपूरची मदत घेतली जाईल, असे यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – बुलढाण्यात खळबळ! दिल्लीचा गँगस्टर नीरज बवानाच्या नावाने मागितली ४० लाखांची खंडणी, गुन्हा दाखल

कार्यक्रमाला अतिरिक्त आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, आयडीएचे माजी अध्यक्ष डॉ. वैभव कारेमोरे, आणि डॉ. सचिन खत्री उपस्थित होते.