नागपूर: महावितरणच्या विदर्भातील ५३ हजार ४७८ ग्राहकांनी वीजदेयकांसाठी छापील कागदाचा वापर बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या सर्व ग्राहकांचे वर्षाला ६४ लाख रुपये वीज देयकात वाचत आहे. महावितरणकडून ‘एसएमएस’द्वारे वीजदेयकाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीजदेयक ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी ग्राहकांना छापील देयकाची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या http://www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांचे वीजदेयक मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान प्रत्यक्ष देयक न घेतल्याने या ग्राहकाला एका महिन्याच्या देयकावर १० रुपये तर वर्षाच्या १२ देयकांवर १२० रुपये बचत होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 53 thousand electricity consumers save 63 lakhs in payment go green scheme mnb 82 ysh