नागपूर : ५५ वर्षीय व्यापाऱ्याने मित्राच्या १५ वर्षीय मुलीला महागडे कपडे, गिफ्ट, चॉकलेट देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला कारने सौंसरमध्ये नेऊन रात्रभर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी मुलीचे आईवडिल पोलीस ठाण्यात पोहचले. त्यामुळे त्याने मुलीला घरी सोडून पळ काढला. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. संजय ससाने (५५, सिंजर, ता. नरखेड) असे आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय मुलगी तनुजा (बदललेले नाव) ही कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आईवडिल व लहान भावासह राहते. आरोपी संजय ससाने कापूस खरेदी-विक्री करणारा व्यापारी आहे. तो तनुजाच्या वडिलाचा मित्र आहे. त्याला पत्नी व दोन मुले आहेत. त्यामुळे त्याचे नेहमी तनुजाच्या घरी येणे-जाणे होते.

संजय श्रीमंत असल्यामुळे तो नेहमी मित्राच्या घरी आल्यानंतर काहीतरी गिफ्ट, चॉकलेट घेऊन येत होता. तनुजाचे तो नेहमी कौतूक करीत होता. दरम्यान, त्याला १५ वर्षीय तनुजा आवडायला लागली. त्याने तिला खुश करण्यासाठी नेहमी महागडे कपडे घेऊन देत होता. त्यामुळे तीसुद्धा वडिलाच्या मित्राच्या प्रेमात पडली.

तिच्या वडिलांना घर बांधायचे असल्यामुळे त्यांना ५० हजार रुपयांचे कर्ज दिले. त्याने तिला महागडा मोबाईल घेऊन दिला. दोघेही संपर्कात राहू लागले. तनुजाचे आईवडिल घरी नसताना तो घरी यायला लागला. दरम्यान, तिला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घरी कुणी नसताना तो तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागला.

अल्पवयीन असलेल्या तनुजाला त्याने लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिला तो शहरात फिरायला नेऊन तिच्यावर पैसे उडवायला लागला. तो वारंवार घरी येत असल्यामुळे मुलीच्या वडिलांना संशय आला.मुलीचे मित्रासोबत प्रेमप्रकरण असल्याची कुणकुण वडिलांना लागली. शेजाऱ्यांमध्ये दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा व्हायला लागली. त्यामुळे तिच्या वडिलाने मुलीला मावशीच्या घरी काही दिवसांसाठी नेऊन ठेवले.

कारमधून नेले पळवून

तनुजाला मावशीकडे ठेवल्यामुळे संजय तणावात आला. त्याने व्यापारी मित्र सुरेश ढोपरे याला हाताशी धरुन तनुजाला पळवून नेण्याचा कट रचला. त्याने मध्यप्रदेशातील सौंसर येथे एक भाड्याने खोली घेतली. २० फेब्रुवारीला रात्री बारा वाजता सुरेश ढोपरेने तिला मावशीच्या घरातून बाहेर बोलावले. कारमध्ये बसवून जामखेडला आणले. तेथून संजय हा तनुजाला घेऊन सौंसरमधील खोलीवर गेला. तेथे तनुजावर रात्रभर त्याने बलात्कार केला आणि दुसऱ्या दिवशी तो घराकडे परतला.

असा झाला प्रेमप्रकरणाचा उलगडा

वडिलांनी मुलीच्या अपहरण केल्याची तक्रार कोंढाळी पोलीस ठाण्यात दिली. ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी तपासात संजय ससानेला ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला नकार दिला. मात्र, त्याला पाहुणचार देताच त्याने तनुजाला सौंसरमधील घरी ठेवल्याची कबुली दिली. तेथून मुलीला ताब्यात घेतले. मुलीने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली. त्यामुळे आरोपी संजय ससानेला अटक केली तर त्याचा साथिदार सुरेश ढोपरे फरार झाला आहे.

Story img Loader