प्रकृती बरी नसलेल्या मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून राग अनावर झालेल्या व्यक्तीने एका ५५ वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. ही घटना भद्रावती तालुक्यातील कोंडेगाव येथे घडली. यात घनशाम सहारे याचा मृत्यू झाला असून त्याचा मुलगा शक्ती सहारे (२४) गंभीर जखमी झाला. याप्रकरणी आरोपी तुकाराम नारायण भोयर (५५) याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलीस निरीक्षक गोपाल भारती व उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपीच्या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे त्याने घनशामकडे दुचाकीची मागणी केली. मात्र घनशामने ती दिली नाही. यावरून दोघात वाद झाला. हा वाद घनशामचा मुलगा शक्ती याने सोडवला. दरम्यान, आरोपी घरी गेला व धारदार शस्त्र आणून त्याने घनशामवर हल्ला चढवला. पित्याच्या मदतीला शक्ती धावला असता आरोपीने त्याच्यावर सुद्धा हल्ला केला. या घटनेत घनशाम सहारे याचा मृत्यू झाला. जखमी शक्तीला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वात भद्रावती पोलीस करीत आहेत