नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येतआहे. यासाठी सुमारे साडेपाच हजार शिक्षकांची सर्वेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात ५ हजार ४५१ शिक्षक हे सर्वेक्षणा करीत आहे. शिक्षक प्रत्यक्ष वस्ती, वाडी, गाव, खेडी, तांडे, शेतमळा, वार्ड अशा ठिकाणी सर्वेक्षण करीत आहे. निरक्षराची नावे, लिंग, जात प्रवर्गनिहाय माहिती संकलित करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> “…हा तर दीक्षाभूमीला नाहक बदनाम करण्याचा डाव,” प्राध्यापक भरतीमध्ये कुठलाही हस्तक्षेप नाही; सचिवांचा दावा
या निरक्षरांना ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करुन देणे हा सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सर्वेक्षण हे शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर केले जात आहे. १५ वर्षे व त्यापुढील सर्व निरक्षरांचा यात समावेश आहे. सोबतच शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीमही राबविण्यात येत आहे. ५ हजार ४५१ सर्वेक्षकांच्या मदतीने येत्या ३१ ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.