बुलढाणा : जिल्ह्यातील अवर्षणप्रवण मोताळासह मलकापूर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजना मार्गी लागली असून यासाठी तब्बल ५६३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील १३ हजार ७४३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टिकोनातून खासदार प्रतापराव जाधव यांनी सातत्याने योजनेचा पाठपुरावा केला आहे. त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले असून केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने योजनेला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा – नागपूर : शहरात देहव्यापार वाढला, दिल्ली-मुंबईच्या मॉडेल सेक्स रॅकेटमध्ये सक्रीय, तारांकीत हॉटेलमध्ये तरुणींचा मुक्काम

केंद्र शासनाच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीत तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या बोदवड परिसर सिंचन योजना टप्पा एकचा समावेश केंद्राच्या योजनेत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याची किंमत २ हजार १४१ कोटी १९ लाख रुपये आहे. विदर्भातील ६ हजार १६७ हेक्टर, अवर्षणप्रवण भागातील ९ हजार ५०७ तर सर्वसाधारण क्षेत्रातील ६ हजार ५४६ मिळून १३ हजार ७४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

हेही वाचा – दुर्गम भागातील डॉक्टरांना २३ वर्षांपासून पदोन्नती नाही, आरोग्य विभागातील सावळा गोंधळ

सततच्या पाठपुराव्याने योजनेचा मार्ग मोकळा झाला असून कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाब असल्याची प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी दिली. मंजूर ५३६ कोटी ६४ लाख रुपये येत्या तीन वर्षांत केंद्रामार्फत मिळणार आहे. उर्वरित ५४३ कोटी ३५ लाख रुपये राज्य शासन खर्च करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 563 crores sanctioned for bodwad upsa irrigation scheme scm 61 ssb
Show comments