नागपूरमधील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका ५७ वर्षीय शिक्षकाने १२ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचाराचा कळस गाठला आहे. आरोपीनं सुमारे चार महिने पीडित मुलीचं लैंगिक शोषण केलं आहे. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला सक्करदरा पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डिसेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत आरोपी शिक्षकाने शाळेतील १२ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार केला आहे. संजय पांडे असं आरोपी शिक्षकाचं नाव असून पोलिसांनी आरोपीला गजाआड केलं आहे. आरोपी संजय पांडे हा कामगारनगर परिसरातील रहिवासी आहे. आरोपीवर भादवी कलम ३७६ सह इतरही कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नराधम आरोपी पीडित मुलीला शाळेतल्या सायन्स लॅबमध्ये घेऊन जात अत्याचार करत होता, असं तपासात उघड झालं आहे.

हेही वाचा- अपंग मुलाला बरं करतो म्हणत मुलाच्या आईसोबत मांत्रिकाचं विकृत कृत्य, पुण्यातील संतापजनक घटना

बारा वर्षीय पीडित मुलीने पोटात दुखत असल्याची माहिती आपल्या आईला दिली होती. पण आईने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर आईने आपल्या मुलीला विश्वासात घेऊन आणखी माहिती विचारली असता तिने सगळा प्रकार सांगितला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सक्करदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी या प्रकरणात आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.