गोंदिया : महावितरण आता माहिती आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करीत आहे. ग्राहकांना घरबसल्या वीज मीटर, बिल, बिल भरणा, रिडिंग आदींची माहिती घेऊ शकतात. त्यासाठी त्यांच्या वीज बिलाला मोबाइल क्रमांक जोडले आहे. गोंदिया परिमंडळातील ६ लाख ७५ हजार ५८३ वीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक जोडले आहे. ९३.४२ टक्के ग्राहकांनी मोबाइल जोडले असून गोंदिया परिमंडळाने यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

महावितरणकडे मोबाइल क्रमांकाची नोंदणी करणे वीज ग्राहकांना मीटर रिडिंग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात येते. ग्राहकांना मीटर रिडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रिडिंग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा संदेश महावितरणकडून पाठविला जातो. यात विसंगती आढळल्यास तातडीने तक्रार करून बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात.तर वीजबिल तयार झाल्यानंतर बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा एसएमएस ग्राहकांना पाठवितात.

हेही वाचा >>> वणीत आरटीओकडून धडक कारवाई, वाहनधारकांना अडीच लाखांचा दंड

याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद केलेला वीजपुरवठा व पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याची पूर्वसूचना या एसएमएस मार्फत दिली जाते. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा बंद झाल्यास त्याची माहिती व वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागणारा कालावधींची माहिती या सुविधेत मिळते. ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तब्बल ५७ लाख ९ हजार ३५७ वीज:ग्राहकांनी स्वतःच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी केली आहे. एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत ही टक्केवारी ९१.१३ टक्के आहे. गोंदिया परिमंडळातील ६ लाख ५७ हजार ५८३ ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे आहे. टक्केवारीनुसार गोंदिया परिमंडळ अव्वल ठरले आहे.

हेही वाचा >>> इंग्रजी सुधारण्‍यासाठी इंग्रजी माध्‍यमाचाच आग्रह कशासाठी? शालेय शिक्षण विभागाच्‍या निर्णयावर आक्षेप

अॅपची सुविधा उपलब्ध

महावितरण कॉल सेंटरच्या १८००२१२३४३५ आणि १८००२३३३४३५ या टोल फ्री या क्रमांकावर देखील ग्राहकाला त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्याची सुविधा आहे. कॉल सेंटर व्यतिरिक्त महावितरणच्या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल अॅपवर देखील मोबाइल क्रमांक नोंदणीची सुविधा असल्याने ग्राहक या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात.

Story img Loader