नागपूर: शहरात अनेक गुन्हेगारांकडे पिस्तूल असल्याचे उघडकीस येताच गुन्हे शाखा आणि डीबी पथकातील पोलीस कर्मचारी सक्रिय झाले. मोमिनपुरा येथे पिस्तूल-काडतूस विक्री करणारी टोळी समोर आल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी कुख्यात अफसर अंडाच्या घरावर छापा घातला. त्याच्याकडे सहा जिवंत काडतूस आढळून आली. गुन्हेगार फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख अफसर उर्फ अंडा शेख युसूफ (५०, राजीव गांधीनगर, आयबीएम रोड) याच्याकडे पिस्तूल व इतर घातक शस्त्र असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. त्याच्या घरी धाड टाकून शोधाशोध केली असता घरातून ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्या पत्नीला विचारणा केली असता अफसरने ती आणून ठेवल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा… प्रेमविवाहानंतर चार वर्षे सुखी संसार, नंतर कौटुंबिक वाद; पत्नी निघाली दुसरे लग्न करायला, पुढे झाले असे की…

पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. नागपुरात अशा पद्धतीने अनेक गुन्हेगारांकडे देशी पिस्तुले व काडतुसे असून, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे त्यांची खरेदी-विक्री सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 cartridges seized from the house of notorious criminal sheikh afsar in nagpur adk 83 dvr
Show comments