बुलढाणा: मलकापूर नजीक झालेल्या भीषण अपघातातील ६ मृतांची ओळख पटली असून सर्वजण हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. २० जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयत उपाचर करण्यात येत आहे. या अपघातामध्ये ६ जण ठार झाले असून २५ जण जखमी झाले असून पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूरनजीकच्या रेल्वे उड्डाणपूलावर शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडला. अपघातामध्ये सहा जण ठार झाले असून सर्व मृतक हे हिंगोली जिल्ह्यातील आहेत. यामध्ये बसचालक संतोष आनंदराव जगताप (रा. भांडगाव), राधाबाई सखाराम गाढे (रा. जयपूर), आचारी असलेले अर्चना गोपाल घुकसे आणि सचिन शिवाजी महाडे (दोघेही रा. लोहगाव), बस मालक शिवाजी धनाजी जगताप (रा. भांडेगाव) आणि कानोपात्रा गणेश टेकाळे (रा. सिंधीनाला, ता. हिंगोली) यांचा समावेश आहे. कानोपात्रा टेकाळे यांना गंभीर अवस्थेत बुलढाणा सामान्य आणण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव हे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले.
हेही वाचा… Buldhana Travels Accident: वारसांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
२० जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे . मेनका विष्णु खुळे (३०, रा. लोहगाव), द्वारका गजानन रोडगे (३०, रा. जामरून, हिंगोली), महादेव संभा रणबळे (५०, रा. खंडाळा), गंगाराम गीते (६३, रा. शिमगीनागा, सेनगाव), संतोष भिकाजी जगताप (५४, रा. भांडेगाव), भगवान नारायन गिते (४८, रा. शिमगीनाका, सेनगाव), राधा नाथा घुकसे (३२, रा. लोहगाव), लिला एकनाथ आसोले (३३, रा. काळेगाव), पार्वती काशिनाथ ठोकळे (६०, सेनगाव), बद्रीनाथ संभाजी कऱ्हाळे (५४, रा. दिग्रस कऱ्हाळे), गिरीजा बद्रीनाथ कऱ्हाळे (५०, रा. दिग्रस कऱ्हाळे), बेबी कऱ्हाळे (५०, रा. डिग्रस कऱ्हाळे), हनुमंत संभाजी फाळके (२६, जयपूर), काशीराम महाजी गिते (४०, रा. सेनगाव), भागवत पुंजाजी फाळके (२८, रा. जयपूर वाडी), किसन नामाजी फसाटे (६०, रा. शिमगीनाका), गणेश शिवाजी जगताप (३८, रा. भांडेगाव), उमाकांत महादजी येवले (३९, रा. शिवनी, ता. सेनगाव).
हेही वाचा… जागतिक व्याघ्र दिनी वाघीण मृतावस्थेत आढळली; वनखात्यात खळबळ
जखमीपैकी बेबी कऱ्हाळे आणि गिरजा कऱ्हाळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. संगीता पोद्दार (४२, रा. नागपूर) या नागपूरवरून नाशिकडे जाणाऱ्या खासगी बसमधील प्रवाशी असून एका शाळेत त्या प्राचार्य आहेत. विक्रांत अशोक समरीत (२८, रा. अमरावती) हा जखमी एमएच-२७-बीएक्स ४४४६ या बसचा चालक आहे. या सर्व जखमींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १० जुलै रोजी सुरू केली होती धार्मिक यात्रा हिंगोली जिल्ह्यातून जवळपास ४० जणांनी १० जुलै रोजी त्यांची धार्मिक यात्रा सुरू केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांचे सांत्वन
जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. सोबतच उपचार झाल्यानंतर पुर्ण बरे वाटत असलेतर जखमींनी सुट्टी घ्यावी, असे स्पष्ट केले. दुसरीकडे खासगी प्रवाशीबस महामार्गावर ज्या ठिकाणी थांबतात तेथे मद्य मिळणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल असे ते म्हणाले.