लोकसत्ता टीम

नागपूर : शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शहरभरातील गुन्हेगार घाबरतात. परंतु, नागपुरातील एका पोलीस ठाण्यात एक अजब घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सर्व कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त होते. तेवढ्यात जवळपास ६ फुट लांबीचा साप ठाण्यात शिरला. साप नजरेस पडताच पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. सर्व कर्मचारी पोलीस ठाण्याबाहेर पळायला लागले. एका कर्मचाऱ्याने सर्पमित्राला फोन केला. काही मिनिटातच सर्पमित्र आला. त्याने पोलीस ठाण्यात घुसून घोणस जातीचा साप पकडला. साप पकडल्याचे कळताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर सर्व कर्मचारी पोलीस ठाण्यात गेले आणि पुन्हा कामाला लागले.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक

परीमंडळ एकमध्ये समावेश असलेले एमआयडीसी पोलीस ठाणे नेहमी व्यस्त असते. रात्रभर पोलीस बंदोबस्त, कर्तव्य आणि पोलीस ठाण्यातील अन्य तपासाच्या कामात व्यस्त असतात. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता काही पुरुष आणि महिला पोलीस कर्मचारी स्टेशन डायरीवर काम करीत होते. तर काही पोलीस कर्मचारी तपासात व्यस्त होते. यादरम्यान, जवळपास ६ फुट लांबीचा विषारी घोणस जातीचा साप पोलीस ठाण्यात शिरला.

आणखी वाचा-नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

तो थेट पोलीस निरीक्षकाच्या कक्षाकडे जायला निघाला. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या दृष्टीस तो साप पडला. त्या महिला कर्मचाऱ्याने लगेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले आणि ‘अलर्ट’ केले. घोणस जातीचा विषारी साप बघताच पोलिसांची तारांबळ उडाली. सापाला बघून पोलीस कर्मचाऱ्यांनी लगेच पोलीस ठाण्यातून बाहेर पळ काढला. एका पोलीस कर्मचाऱ्याने विदर्भ सर्पमित्र संघटनेचे अमित वंजारी यांना फोन करुन माहिती दिली. त्यांनी लगेच वानाडोंगरी येथे राहणारे सर्पमित्र आकाश मेश्राम एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचले. त्यावेळी संपूर्ण पोलीस ठाणे रिकामे होते.

आणखी वाचा-‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे

… आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

सर्पमित्र आकाश याला साप कोणत्या दिशेला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने त्या दिशेने सापाचा शोध घेतला. काही मिनिटातच त्याला साप दिसला. मात्र, साप पोलीस ठाण्यातील एका कपाटाखाली गेल्यामुळे केवळ सापाचे शेपूटच दिसत होते. शेवटी काही पोलिसांच्या मदतीने कपाट सरकविण्यात आले. त्यानंतर सापाला सर्पमित्राने मोठ्या शिताफीने पकडले. एका बरणीमध्ये त्या सापाला बंदिस्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सर्व कर्मचाऱ्याने सर्पमित्राचे आभार मानले आणि पोलीस ठाण्यात आपापल्या कर्तव्यात पुन्हा गुंतले. एका सापामुळे मात्र जवळपास तीन तास पोलीस ठाण्यातील कामांचा खोळंबा झाला होता.