बुलढाणा : चिखली येथील शासकीय वसतिगृह मधील सहा विध्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधितांनी शासकीय ऐवजी खाजगी रुग्णालयात बाधितांना दाखल केल्याने आश्चर्यवजा संताप व्यक्त होत आहे. यामागे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. चिखली स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहात शिकणाऱ्या ६ विध्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याने आज उत्तररात्री चिखली तील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वसतिगृहातील ६ मुलींना अत्यवस्थ अवस्थेत आज उत्तररात्री चिखलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असफल ठरला. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र वेगाने पसरली. १७ वर्षे वयोगटातील विध्यार्थिनींवर उपचार सुरू आहे. याची माहिती मिळताच आमदार श्वेता महाले यांनी यंत्रणांना खडसावले. त्यांच्यासह समाजकल्याण व संबंधित अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली. आमदार श्वेता महाले यांनी बाधित व वसतिगृहातील विध्यार्थिनींची विचारपूस केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 6 female students poisoned in government hostel in chikhli buldhana scm 61 amy
Show comments