गोंदिया : माणसाला घाबरविण्याकरिता फक्त एक साप पुरेसा असतो, ज्याला बघून भल्या भल्या माणसांचीही अवस्था बिघडते, पण जरा विचार करा, अगदी ६ फूट लांबीचा कोब्रा साप घरात आला तर त्या घरात राहणाऱ्या लोकांची काय अवस्था होईल? अंगाला काटा येणे स्वाभाविकच आहे.अशीच एक घटना गोंदियाला लागून असलेल्या चांदनीटोला आणि फुलचूर या ग्रामीण भागात उघडकीस आली असून आज आणि काल अशा दोन दिवसांत सर्पमित्र बंटी शर्मा यांनी दोन कोब्रा सापांची त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुटका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदिया तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अनेक विषारी साप निघत आहेत. गोंदिया लगतच्या ग्रामीण भागात अनेक साप आपल्या बिळातून बाहेर येत आहेत. त्यात विषारी कोब्राचाही समावेश आहे. पहिली घटना १ मार्च रोजी गोंदियातील रामदेव कॉलनी, आंबाटोली, फुलचूर परिसरात घडली. येथील रहिवासी विजय कुमार बघेल यांच्या घराच्या अंगणातील बागेत घरातील एका मंडळीला विषारी कोब्रा साप दिसला असता घरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर कुटुंबीयांनी लगेच सर्प पकडणारा सर्प मित्र बंटी शर्मा यांना माहिती दिली. त्यांनी लगेच विजयकुमार यांच्या घरी पोहचून दिसलेल्या कोब्रा म्हणजेच गवराया नाग चा घरातील बगीच्यात शोध सुरू केला. काही वेळातच त्यांना ते साप दिसून आला, तो विषारी होता.

सर्प मित्र बंटी शर्मा यांनी मोठ्या शिताफीने त्या सापाला पकडून एका प्लास्टिक च्या पिशवीत भरून त्याची घटनास्थळावरून सुटका करण्यात आली आणि त्यानंतर त्याला नैसर्गिक क्षेत्रात सुरक्षितपणे सोडण्याची कारवाई करण्यात आली.दुसरी घटना २ मार्च रोजी गोंदियाला लागून असलेल्या चांदनीटोला येथे जयराम चिखलोंडे यांच्या घराच्या पाठीमागील अंगणाच्या पायऱ्या जवळ ६ फूट लांब कोब्रा साप बसलेला दिसला. जयराम यांनी ही लगेच सर्पमित्र बंटी शर्मा यांना पाचारण केले. सर्पमित्र बंटी शर्माने लगेच पोहचून त्या सापाला बाहेर काढले. त्या कोब्रा सापाला सुरक्षित जंगल असा त्याचा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

सर्प मित्र बंटी शर्मा यांनी सांगितले की, आपण गेल्या १२ वर्षांपासून सापांची सुटका करत असून आजपर्यंत हजारो साप पकडले आहेत, जेव्हा मोठ्या संख्येने साप बाहेर पडतात तेव्हा सर्पमित्र टिनू लाडेकर आणि मनीष भाई नाईक यांचीही त्याला साप पकडण्यात साथ मिळत असल्याचे ही सर्प मित्र बंटी शर्मा यांनी सांगितले.

अन्नाच्या शोधात साप घरात घुसतात

सर्पमित्र बंटी शर्मा यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या दिवसात किंवा दमटपणामुळे साप वस्तीत येतात, अनेकवेळा अन्नाच्या शोधात (उंदीर, कोंबडीची पिल्ले, कबुतर) घरात प्रवेश करतात, हा कोब्रा साप (गवारिया नाग) हुशार आहे, तो हळू चावत नाही, हाताने पकडण्याचा प्रयत्न घेतल्यावरच चावतो. कोणत्याही सापाने चावा घेतला असता अशा परिस्थितीत ताबीज किंवा गंडा वापरण्याऐवजी लवकरात लवकर सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जा आणि स्वतःवर उपचार करा.