बुलढाणा: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील तीस हजारावर कर्मचारी संपावर गेले आहे. मात्र न्यायालयीन कर्मचारी संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून कामकाज करीत आहे. तेरा तालुक्याच्या ठिकाणची न्यायालये मिळून जिल्ह्यातील न्यायालयांची संख्या वीस इतकी आहे. या सर्व न्यायालयात मिळून कमीअधिक ६०० कर्मचारी कार्यरत असल्याचे न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हे कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी न होता १४ मार्चपासून काळ्या फिती लावून काम करीत आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीच निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2023 रोजी प्रकाशित
जुन्या पेन्शनच्या मागणीला सहाशे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा पाठिंबा; काळ्या फिती लावून काम
हे कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी न होता १४ मार्चपासून काळ्या फिती लावून काम करीत आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 15-03-2023 at 15:20 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 600 court staff support government employee strike for old pension demand scm 61 zws