बुलढाणा: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जिल्ह्यातील तीस हजारावर कर्मचारी संपावर गेले आहे. मात्र न्यायालयीन कर्मचारी संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून कामकाज करीत आहे.  तेरा तालुक्याच्या ठिकाणची न्यायालये मिळून जिल्ह्यातील न्यायालयांची संख्या वीस इतकी आहे. या सर्व न्यायालयात मिळून कमीअधिक ६०० कर्मचारी कार्यरत असल्याचे न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हे कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी न होता १४ मार्चपासून काळ्या फिती लावून काम करीत आहे. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीच निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा