चंद्रपूर: कृषी प्रदर्शनात काहीना काही आकर्षणचे असतेच. काळाच्या ओघात आता नव्याने येणाऱ्या यांत्रिकिकरणाचे आकर्षण शेतकऱ्यांना कायम राहिलेले आहे. पण चंद्रपूर येथील कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू दासकुमार ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या ‘हल्ल्या’त काय विशेष, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. हा मूळचा हरियाणा येथील मुर्हा प्रजातीचा ‘हल्ल्या’ असून त्याचे साधारणतः वजन तब्बल ६०० किलो इतके आहे. रुबाबदार दिसणाऱ्या हल्ल्याला तब्बल ४० लाखाची मागणी आली. मात्र मालकाने प्रेमापोटी विकण्यास नकार दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. अगदी रुबाबदार दिसणारा या दासकुमार’ला कृषी प्रदर्शनात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे.

हेही वाचा… चंद्रपूर: जलजीवन मिशनच्या कामात ७८ कंत्राटदारांना निविदेच्या २.५ टक्के दंड

वर्षाच्या सुरवातीला मंगळवार ३ जानेवारी रोजी राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा क्लब ग्राउंड येथे ‘चांदा ऍग्रो २०२४’ कृषी मोहत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. या कृषी प्रदर्शनात आधुनिक शेती, यांत्रिकिकरण, शेती अवजारे, बांबू शेती, वनशेती, रानभाजी शेती, शेती उपयोगी पाळीव पशू, असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे स्टॉल लागले आहेत. या प्रदर्शनात शेतकऱ्यांसह व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांची तर गर्दी होत आहे. पण खरा आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील किन्ही येथील मुर्हा प्रजातीचा दास कुमार हल्ल्या.

हेही वाचा… नागपुरात सीबीआयची कारवाई; १० लाखांच्या लाच प्रकरणात पेसोच्या दोन अधिकाऱ्यांसह चौघांना अटक

आज या कृषी प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून अशी काय चर्चा दासकुमार हल्ल्याची आहे. की नागरिकांची पावले आपोआप या कृषी प्रदर्शनाकडे वळत आहे. जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आयोजित या कृषी प्रदर्शनात महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा सीमेलगतच्या राज्यातील नागरिक सहभागी होत आहेत.