अनिल कांबळे, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर: राज्यात रस्ते अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून अनेक अपघातातील मृत्यू चारचाकी वाहन चालकाने सिटबेल्ट न लावल्यामुळे झाल्याचे समोर आले. राज्यभरात ३३ टक्के वाहनचालक सिटबेल्ट लावत नाहीत तर चालकाच्या बाजूला बसणारे ८४ टक्के प्रवासी सिटबेल्टचा वापर करीत नाहीत. ही माहिती परिसर या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
देशभरात गेल्या पाच वर्षांत ८९ हजार ०६९ जण केवळ सिटबेल्ट न लावल्यामुळे अपघातात ठार झाले तर २ लाख ५९ हजार ५७६ जण जखमी झाले. हाच आकडा महाराष्ट्रात ६ हजार ११६ इतका आहे. १४ हजार ८४४ जण जखमी झाले. मृतांमध्ये चालकांचे प्रमाण ४५ टक्के तर सहप्रवाशांचे प्रमाण ५५ टक्के आहे. जखमींमध्ये ३८ टक्के चालक तर ६२ टक्के प्रवासी आहेत. एप्रिल ते जून २०२३ अशा तीन महिन्यांत राज्यात केलल्या सर्वेक्षणात ११ हजार २२९ प्रवासी असलेल्या ६ हजार ८२७ वाहनांचा समावेश होता. त्यामध्ये कोल्हापुरातील सर्वाधिक १२५६ वाहनचालकांनी सिटबेल्ट लावले नव्हते तर पुण्यातील सर्वाधिक ९२ टक्के वाहन चालकांनी नियमानुसार सिटबेल्ट लावल्याचे आढळून आले. नागपुरातील ७७ टक्के तर छत्रपती संभाजीनगरातील ८० टक्के वाहनचालकांनी सिटबेल्टचा वापर केल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.
आणखी वाचा-वाशिम जिल्ह्यात बोगस शाळांना आशीर्वाद कुणाचे? ‘आप’चा शिक्षण विभागाला सवाल
नियम पाळण्यात पुणेकर पुढे
वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांमध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरपेक्षा पुण्यातील वाहनचालक सजग आहेत. पुण्यात ६५९ चालकांपैकी ५७५ चालकांनी सिटबेल्ट लावला होता. म्हणजेच पुण्यातील ९२ टक्के वाहनचालक सिटबेल्टचा वापर करतात. सर्वाधिक ४३ टक्के सहप्रवासीसुद्धा सिटबेल्ट लावतात. तसेच अन्य वाहतूक नियमांचाही पालन करत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
राज्यात रक्तरंजित घटनांपेक्षा चौपट मृत्यू रस्ते अपघातात होतात. वाहतूक पोलीस वाहनचालक आणि सहप्रवाशांवर सिटबेल्ट न लावण्याबाबत किरकोळ कारवाई करून वेळ मारून नेतात. गृहमंत्री आणि महासंचालकांनी गांभीर्य दाखवल्यास अपघातावर नियंत्रण येऊ शकते. -संदीप गायकवाड, रस्ता सुरक्षा सल्लागार, परिसर संस्था.