लोकसत्ता टीम

चंद्रपूर: या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात १८ लाख २ हजार ८११ मतदार आहेत. यामध्ये १०० ते १०९ वर्ष वयोगटाचे ६१६ तर ११० ते ११९ वयोगटातील ४ मतदार आहेत. तर १८ ते १९ वयोगटातील ६ हजार २१३ मतदार आहेत. ४० ते ४९ वर्ष वयोगटातील सर्वाधिक ४ लाख २३ हजार ८२ मतदार आहेत.

home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sagar Meghes pointed speech front of nitin gadkari is getting discuss
‘तीनदा पराभव, डॉक्टर अन् राजकारणाचा किडा…’ सागर मेघे यांच्या टोकदार भाषणाची गावभर चर्चा…
Vote and get discount on hotel bill 10 percent discount on payment of voters on behalf of Pune Hotel Association
मतदान करा अन् बिलात सवलत मिळवा! पुणे हॉटेल संघटनेच्यावतीने मतदारांच्या देयकावर १० टक्के सूट
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात
thane district home voting
ठाणे जिल्ह्यात ९३३ नागरिक करणार गृह मतदान, आज पासून मतदानास सुरुवात
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
Akola Assembly Election 2024, Caste Equation in Akola Vidhan Sabha Constituencies,
Akola Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यात चुरशीच्या लढती, जातीय समीकरणे कळीचा मुद्दा; मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार, भारत निवडणूक आयोगाने पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १८ ते १९ वयोगटातील महाविद्यालयातील नव मतदार, दुर्गम भागातील भटक्या व विमुक्त जातीतील नागरीक, तृतीयपंथी नागरिक, देहविक्री करणा-या महिला, लैंगिक अत्याचाराने पिडीत महिला, अनाथालयातील १८ वर्षांवरील मुले / मुली, वृद्धाश्रमातील वृद्ध नागरिक आदींचे मतदार यादीत नाव नोंदणी करण्याकरीता विशेष मोहीम राबविण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १९ ऑक्टोबर २०२३ पासून महाविद्यालयात १८ ते १९ वयोगटातील तसेच ज्या विद्यार्थ्यांचे मतदार यादीत नाव नाही, अशा विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील १०५ महाविद्यालयात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

आणखी वाचा-कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप कायम, आंदोलक मुंबईकडे निघाले

१ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघानुसार एकूण ९ लक्ष २५ हजार १५० पुरुष मतदार, ८ लक्ष ७७ हजार ६०९ स्त्री मतदार, तर ५२ तृतीयपंथी असे एकूण १८ लक्ष २ हजार ८११ मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण ९९७९ दिव्यांग व्यक्तिंची नोंदणी असून यापैकी मतदार म्हणून ५२२७ दिव्यांगांची नोंदणी झाली आहे. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये बदल करण्यात आलेल्या मतदान केंद्राची संख्या ५४ आहे. १३७ मतदान केंद्राच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे तर विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्राची संख्या २ आहे. प्रस्तावित नवीन मतदान केंद्राची संख्या ११ असून एकूण २११ मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. सुसूत्रीकरणानंतर होणारी मतदान केंद्राची संख्या ही २०३२ झाली आहे.

नव मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदार हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नव मतदारांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी या मोहिमेदरम्यान आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी व आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. -विनय गौडा, जिल्हाधिकारी