वस्तीत राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीला वेगवेगळी आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत गर्भवती केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात ६२ वर्षीय वृद्धाला सात वर्षांची शिक्षा सुनावली.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. सी. शेंडे यांनी आरोपी वृद्धाला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. श्रीराम रामजीवन शर्मा (रा. यशोधरानगर) असे दोषीचे नाव आहे. पोलिसांनी श्रीरामविरुद्ध २८ जुलै २०१७ रोजी २१ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचार आणि जिवे मारण्याची धमकीचा गुन्हा नोंदविला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अमरावती: फुकट्या प्रवाशांमुळे मध्‍य रेल्‍वेला एका महिन्‍यात १६.८८ कोटींचे उत्पन्न

पींडितेच्या तक्रारीनुसार, परिसरातच राहणाऱ्या श्रीरामने नोव्हेंबर २०१६ ते १ जुलै २०१७ दरम्यान तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. आई-वडिलांना मारण्याची धमकी देऊन तो पीडितेला घाबरवत होता. बदनामीची धमकी देत होता. या दरम्यान पीडितेच्या पोटात दुखू लागले. ती डॉक्टरकडे गेली असता ६ महिन्यांनी गर्भवती असल्याचे समजले. तिने प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. प्रकरण ठाण्यात पोहोचल्याचे समजताच श्रीराम फरार झाला. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तत्कालीन पोउपनि मधुकर काठोके यांनी प्रकरणाची तक्रार करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील आरोप सिद्ध करण्यात यशस्वी झाले. न्यायालयाने श्रीरामला दोषी ठरवून सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.