लोकसत्ता टीम

नागपूर : चिमूर वनपरिक्षेत्रात मंगळवारी झालेल्या दोन वाघाच्या झुंजीत एकाचा मृत्यू तर एक वाघ जखमी झाला. मात्र, या जखमी वाघाने जंगलाचा रस्ता धरल्याने त्याच्या शोधासाठी वनखात्याने तब्बल ६५ वनकर्मचारी आणि १५ ट्रॅप कॅमेरे लावले.

In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
snake entered tiger cage in British era Maharajbagh Zoo staff noticed it immediately and pulled snake out
वाघिणीच्या पिंजऱ्यात शिरला साप आणि आता मोराच्याही…
stray dogs attack on small boy
कल्याणमध्ये भटक्या श्वानाचा शाळकरी मुलावर हल्ला
turtles, rescue missions, Wildlife Treatment Center,
बचाव मोहिमांमधून ४१९ कासवांना जीवदान, वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रामध्ये उपचार
Pregnant woman died in tiger attack, Gadchiroli,
गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात गर्भवती महिला ठार
Two youths die while performing stunts on two wheelers after drinking alcohol
नागपूर : दारु पिऊन दुचाकीने ‘स्टंटबाजी’; दोन युवकांचा मृत्यू

खडसंगी नियतक्षेत्रातील वहानगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात ‘बजरंग’ आणि ‘छोटा मटका’ या दोन वाघांमध्ये शिकारीवरुन झुंज झाली. यात बलाढ्य ‘बजरंग’ मृत्यूमुखी पडला तर ‘छोटा मटका’ गंभीर जखमी झाला. या जखमी वाघाच्या शोधासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक व बफर क्षेत्राचे उपसंचालक यांच्या आदेशावरुन टीम गठीत करण्यात आली.

आणखी वााचा-विदर्भातील नेते प्रचारात; शेतकरी संकटात, व्यापाऱ्यांकडून लूट

खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्यासोबत निमढेला येथील क्षेत्र सहाय्यक बी.आर. रंगारी, खडसंगी क्षेत्र सहाय्यक आर.जे. गेडाम, वनरक्षक जी.एम. हिंगणकर, निखील बोडे, संतोष लोखंडे, चेतन कोटेवार, विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे कर्मचारी, प्राथमिक बचाव पथकाचे कर्मचारी, कुटी मजूर, रोजंदारी मजूर, अलिझंजा व निमढेला निसर्ग पर्यटन प्रवेशद्वारावरील पर्यटक मार्गदर्शक, जिप्सी चालक मालक असे एकूण ६५ वनकर्मचारी यांनी पायदळ गस्त केली. वाघाच्या मृत्यू ठिकाणापासून कक्ष क्र. ५७ व ५५ मध्ये एकूण १५ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. या माध्यमातून जखमी झालेल्या वाघाचा शोध घेतला असता त्याच्या शरीरावर किरकोळ जखमा आढळून आल्या व वाघ सुदृढ अवस्थेत असल्याचे दिसून आले.

Story img Loader