चंद्रपूर : येथे दरवर्षी पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ साजरा करण्याची उज्ज्वल परंपरा आहे. यावर्षी सुद्धा १५ व १६ ऑक्टोबरला ६६ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे.

धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी श्रद्धेय भिक्खुगण, बौद्ध आणि आंबेडकरी विचारवंत, समीक्षक, साहित्यिक व विविधांगी कार्यक्रमांनी सजलेली पवित्र दीक्षाभूमी आधुनिक संपन्नतेने धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी पूर्णत: सज्ज झाली आहे. पुस्तकांचे स्टॉल्स, आरोग्य विभाग, समाजसेवी संघटनांनी स्टॉल लावले आहे.

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Astrology Predictions Number 1 in Marathi
Astrology Predictions Number 1: मूलांक १ चे कसे असेल नवे वर्ष? धनलाभ, प्रेमात अडचणी, तर यंदा ‘या’ महिन्यानंतर सुरू होतील अच्छे दिन
Mantralaya Cabins
Ministers Cabin : नवनिर्वाचित मंत्र्यांना मंत्रालयातल्या दालनांचं वाटप, चंद्रशेखर बावनकुळे ते योगेश कदम कोण कुठे बसणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
narendra modi
पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन

हेही वाचा >>> वाशीम : भाजपचा महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षाला अप्रत्यक्ष पाठिंबा ?

समारंभाची सर्वोत्तम उपलब्धी बोधिसत्व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. व थायलँड येथून प्राप्त दीक्षाभूमीवरील बुद्ध विहारात १६.५ फूट उंच अभय मुद्रेतील बुद्धरूपाचे दर्शन तसेच श्रद्धेय भिक्खू संघाकडून धम्म श्रवण द्वारा धम्ममय आनंदाची रुजवण जगविख्यात बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण द्वारा मानसवृद्धी, धम्मसंबंधित उपयुक्त वस्तूंचे स्टॉल्स, श्रीलंकेतील बोधीवृक्षाच्या शाखेचे दीक्षाभूमीवरील रोपणातून बहरलेल्या बोधिवृक्षाचे दर्शन, समारंभातील लक्षावधी लोकांचा संपर्काचा आनंद, धम्मदानाची सुवर्णसंधी, मोफत वैद्यकीय सेवा इत्यादी समारंभाची विशेषता आहे.

हेही वाचा >>> लोकप्रतिनिधींकडून होणारा वाळूचा काळाबाजार खपवून घेणार नाही ; मिनकॉन परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनावले

संपूर्ण दीक्षाभूमी परिसर रंगीबेरंगी रोषणाईने न्हाऊन निघाला आहे. त्याचप्रमाणे पंचशील ध्वज व पंचशील पताकाने दीक्षाभूमी परिसर सजला आहे. धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात १५ ऑक्टोबर सायंकाळी ४ वाजता वाहनासह मिरवणूक तसेच १६ ऑक्टोबर सकाळी १० वाजता बोधिसत्व प.पू. डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह मिरवणूक काढण्यात येणार आहे. या समारंभास उपस्थित राहण्याची आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर व सचिव वामनराव मोडक यांनी केली आहे.

Story img Loader