नागपूर : नागपूरच्या वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील ६७ माजी आमदारांना ३४.४४ लाखांचे मासिक निवृत्ती वेतन दिले जात असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे. तर ६० हजार ३२४ निवृत्त कर्मचाऱ्यांना १६७.४७ कोटी निवृत्ती वेतन दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वरिष्ठ कोषागार अधिकारी कार्यालय, नागपूरला माहिती अधिकारात जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ या कार्यकाळातील निवृत्त कर्मचारी आणि माजी आमदारांच्या निवृत्ती वेतनाचा तपशील मागितला. त्यांना उपलब्ध माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात जानेवारी २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान ६० हजार ३२४ निवृत्त कर्मचाऱ्यांना २,५२४ कोटी ७२ लाख ९४ हजार ४८५ रुपये निवृत्तीवेतन देण्यात आले. या काळात ६७ माजी आमदारांना ४ कोटी ७८ लाख १७ हजार ४३० रुपये निवृत्तीवेतन दिले गेले.

हेही वाचा >>> तारखेच्या आदल्याच दिवशी परीक्षा; ‘सीईटी सेल’चा नागपुरात गोंधळ

मार्च २०२३ या एकाच महिन्यात ६० हजार कर्मचाऱ्यांना १६७ कोटी ४७ लाख २० हजार ५१ रुपये तर ६७ माजी आमदारांना ३४ लाख ४४ हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात आले. त्यावरून जिल्ह्यातील एका माजी आमदाराच्या निवृत्तीवेतनावर महिन्याला सरासरी ५१ हजार ४०२ रुपये खर्च झाल्याचे समजते. निवृत्त न्यायाधीशांपासून, मेडिकलचे निवृत्त प्राध्यापक व इतर अधिकाऱ्यांना माजी आमदारांहून दुपटीच्या जवळपास तर वर्ग तीन व चार गटातील निवृत्त कर्मचाऱ्यांना माजी आमदाराहून खूप कमी म्हणजे ७ ते ३० हजारादरम्यान मासिक निवृत्ती वेतन मिळते.

हेही वाचा >>> लोकजागर: शत्रुत्वाची मूठ घट्टच!

महिन्याला तब्बल ५० हजार रुपये

नागपूर जिल्ह्यातील कोषागार कार्यालयातून सेवानिवृत्त शिपायापासून निवृत्त न्यायाधीशापर्यंत सात हजार ते अडीच लाख रुपये महिन्यापर्यंतचे निवृत्ती वेतन दिले जाते. माजी आमदारांना महिन्याला सुमारे ५० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते. कमी निवृती वेतन असलेल्यांची संख्या येथे जास्त आहे, अशी माहिती कोषागार कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 67 former mlas get a monthly pension of rs 34 44 lakh mnb 82 ysh
Show comments