वाशीम : ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या मानधनावर आशा स्वयंसेविका, गत प्रवर्तक नित्य नेमाने सेवा बजावित आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने वाशीम सह राज्यातील ७० हजार अशा स्वयंसेविका काम बंद आंदोलन करण्याचा तयारीत असून बेमुदत संपावर आहेत. त्यांना ४ हजार गट प्रवर्तकाचा पाठिंबा असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्टकांची ओळख आहे. घरोघरी भेटी देणे, आरोग्य तपासणी, माता बाळांची काळजी घेणे यासह जवळपास ७२ प्रकारची कामे आशांना करावी लागतात. ग्रामीण भागातील नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांची मात्र सरकार काळजी कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. आशा, गट प्रवर्तक यांना वेतनातील अर्धे वेतन फक्त गाठी,भेटी वर खर्च करावा लागतो. त्यांना दिलेल्या ॲपवर इंग्रजी भाषा असल्याने माहिती नमूद करताना अडचणी येतात.

Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Municipal Corporation pune will provide finance to 11 thousand students
महापालिका करणार ११ हजार विद्यार्थ्यांना सहाय्य, काय आहे कारण?
Chief Minister Devendra Fadnavis directs to evaluate the health system Mumbai news
आरोग्य व्यवस्थेचे मूल्यमापन करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
Health Department Launches Campaign to Inspect Private Hospitals
आरोग्य विभागाचे खासगी रुग्णालयांवर ‘लक्ष’! राज्यभरात नियमभंग शोधून कारवाईची मोहीम
Treatment , babies , neonatal care units ,
आरोग्य विभागाच्या विशेष नवजात काळजी कक्षांमध्ये २ लाख ७७ हजार बालकांवर उपचार
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती
Prakash Abitkar, Prakash Abitkar Pune, Officer Action ,
काम न करणाऱ्यांची गय नाही! कामचुकार अधिकाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी घेतले फैलावर

हेही वाचा >>> अरबी समुद्रातील चक्रीवादळाचे ‘तेज’ असे नामकरण; कसा असेल दोन्ही चक्रीवादळांचा प्रवास जाणून घ्या…

शासन सेवेत असल्याने वेतन श्रेणी, वार्षिक वेतनवाढ बोनस गट प्रवर्तक महिलांना देण्यात यावे, आशा यांना ऑनलाईन कामे देऊ नये, दिवाळी पूर्वी बोनस द्यावे, केंद्राने मोबदल्यात वाढ करावी, किमान वेतन लागू करावे, यासह इतर मागण्यासाठी आशा, गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारला आहे. यामधे जिल्ह्यासह राज्यातील कर्मचारी सहभागी झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Story img Loader