यवतमाळ : या वर्षांत जिल्हा पोलीस दलाने विविध गुन्ह्यांच्या तपासात संयुक्त कामगिरी करीत गंभीर प्रकारात मोडत असलेले खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, असे गुन्हे उघडकीस आणले आहेत. जिल्ह्यात ७८ खुनांच्या घटना घडल्या असून, यात ८६ जणांचा मृत्यू झाला. यात २१ महिला व ६५ पुरुषांचा समावेश आहे. या खूनप्रकरणातील एकूण २१४ आरोपींना अटक करण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जिल्ह्यात यावर्षी पोलिसांच्या तपासाला गती मिळाली तरी गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचे चित्र आहे. सायबर पोलीस ठाणे स्वतंत्रपणे सुरू करण्यात आल्याने पोलीस ठाण्यांची संख्या ३२ झाली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यातील आरोपींना तत्काळ अटक करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न राहिला आहे. जिल्ह्यात साधारण गेल्या १० वर्षांत वर्षाला ७५ खुनांच्या घटनांची नोंद आहे. या वर्षात १३ दरोड्याच्या घटनांचा उलगडा करण्यात आला. ७० आरोपींना अटक करून ६० लाखांच्या मुद्देमालापैकी ४० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला. २०२२ मध्ये ५० टक्के असलेले उलगड्याचे प्रमाण या वर्षात शंभर टक्के आहे. जबरी चोरीच्या ८९ घटनांपैकी ६९ घटना उघडकीस आणल्या आहेत. यात ५५ लाखांपैकी १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जबरी चोरीचे प्रमाण गेल्या वर्षी ६० टक्के होते. ते प्रमाण या वर्षांत ८० टक्क्यांवर गेले आहे.
हेही वाचा – ‘विदेशातील रुग्णांनी भारतात उपचार घ्यावे’, कोण म्हणतंय जाणून घ्या
महिलांच्या संदर्भात पोलीस दलाने अनेक क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले आहेत. या वर्षी १४८ गुन्हे घडले असून, त्यातील १४७ गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यातील ७८ गुन्हे अल्पवयीन बालिकांसबंधात होते. यात एकूण १८९ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. सर्वच गुन्ह्यात वेळेवर दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. गंभीर प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी काही प्रकरणे फास्ट ट्रॅकवर घेण्यात आली आहेत. विनयभंगाच्या ८९ प्रकरणात आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात आली. महिलासंदर्भातील गुन्हे प्रेमसंबंध व ओळखीच्या सहवासातील व्यक्तीकडून घडले आहेत.
जिल्ह्यात अवैध दारू, जुगार कायद्याअंतर्गत प्रभावी कारवाई करण्यात आली. दारूबंदी कायद्याअंतर्गत पाच हजार ५०० गुन्हे नोंदविण्यात आले. जवळपास तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध जुगाराच्या दोन हजार १०० केसेस करण्यात आली आहे. दोन हजार ३५० आरोपींवर कारवाई करण्यात आली. यात साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईचे प्रमाण २०२२ च्या तुलनेत २८ टक्के वाढले आहे. एनपीडीएस कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करीत ७४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
हेही वाचा – घरफोडी-लुटमारीत सर्वाधिक बालगुन्हेगार; महाराष्ट्र पहिल्या तर तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर
या वर्षांत शस्त्र अधिनियमाअंतर्गत एकूण ११४ गुन्हे नोंद आहेत. आर्मअॅक्ट कलमाअंतर्गत १९ गुन्हे नोंद असून, १८ पिस्टलसह २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. जिल्हाभरात चाकू, तलवार, सुरी ९५ गुन्ह्यांत ११२ घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ५२ टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे.
नव्या वर्षात गुन्हेगारी अधिक कमी होण्यासाठी प्रयत्न
जिल्ह्यातील गुन्हेगारावंर वचक निर्माण करून त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा, यासाठी पाच टोळ्यांविरुद्ध मोक्का, १५ आरोपींना तडीपार, एमपीडीएअंतर्गत २४ आरोपींना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. चैन स्नॅचिंगच्या घटनांचा उलगडा करण्यासाठी पोलीस दलाचे निरंतर प्रयत्न सुरू राहणार आहे. या वर्षाप्रमाणेच पुढील वर्षीही अधिक प्रभावी कारवाई करून गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिली.