संस्थेच्या अध्यक्षांसह दहा जणांवर गुन्हा

भंडारा : तुमसर तालुक्यातील येरली येथील धान खरेदी केंद्रात खोटे दस्तऐवज सादर करून शासनाची दिशाभूल करण्यात आली आहे. तब्बल ८ कोटी ५६ लाख ९४ हजारांचा भ्रष्टाचार  झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संस्थेच्या अध्यक्षांसह दहा जणांवर गुरुवारी सायंकाळी तुमसर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Fraud of pretext of loan approval Pune
पिंपरी: कर्ज मंजुरीच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक
crop insurance scam latur
लातूरमधील पीकविमा घोटाळ्याला परळीतून खतपाणी!
crop insurance scam loksatta news
बडे राजकारणी + विमा कंपन्या = पीक विमा घोटाळा
loksatta editorial on crop insurance scam
अग्रलेख : लाश वही है…
fraud with Depositors by Rajasthan Multistate
‘राजस्थान मल्टिस्टेट’मध्ये ठेवीदारांची फसवणूक
Bhupranam Kendra launched in Vasai to expedite the counting and various other works in the Land Records Department vasai news
वसईत ‘भू प्रणाम केंद्र’ सुरू, आर्थिक लुटीला चाप; भूप्रणाम केंद्रांतर्गत ऑनलाइन सुविधा सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा

हेही वाचा >>> Maharashtra News Live : शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार ब्रिटनमधून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू; वाचा राज्यभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी

तुमसर येथील संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला तालुक्यातील येरली येथे धान खरेदी केंद्र मिळाले होते. खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये प्रत्यक्ष धान खरेदी न करता खरेदीचे खोटे दस्तऐवज तयार करून शासन, शेतकरी व पणन महासंघाची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा पणन अधिकारी भारतभूषण पाटील यांनी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात संगनमत करून खरीप पणन हंगामात २०१९ पासून ८ कोटी ५६ लाख ९४ हजार २५७ रुपयांचा अपहार झाल्याचे नमूद आहे.

हेही वाचा >>> यवतमाळ : चित्रा वाघ आणि पत्रकारांमध्ये खडाजंगी, संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष भडकल्या

संत रविदास मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नितीन शालिक भोंडेकर, उपाध्यक्ष संदीप प्रकाश भोंडेकर, संचालक शैलेश राजकुमार तांडेकर, सुनील बसुदास तुरकाने, अजय सदानंद कनोजे, विनोद कुमार प्रेमदास झाडे, अभय प्रकाश रोडगे, अश्विन अजय भोंडेकर, रवी मोतीलाल नरसुरे, ग्रेडर अतुल प्रकाश चौबे (सर्व रा. तुमसर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नितीन मदनकर तपास करीत आहेत.

Story img Loader