राम भाकरे

नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात येणाऱ्या आमदारांची निवास व्यवस्था आमदार निवासात असते. परंतु, सुमारे ८० टक्के आमदारांचा मुक्काम शहरातील विविध तारांकित हॉटेल्स आणि शासकीय विश्रामगृहात आहे. आमदार निवासात केवळ कार्यकर्ते आणि स्वीय सचिव थांबले आहेत.

Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
11869 flights landed at nagpur international airport in 2024
बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ उपराजधानीत १२ महिन्यात ११ हजार ८६९ विमाने उतरली
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
ITC Hotels To Be Second Largest Hotel Company By Market Cap
आयटीसी समूहातील ‘या’ हॉटेल कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश
Renovation of Ram Ganesh Gadkari Rangayatan Theatre is underway reduced seating capacity by 50 60 chairs
ठाण्याच्या गडकरी रंगायतनची आसन क्षमता होणार कमी, जुन्या खुर्च्यांच्या जागी लागणार नवीन एैसपैस खुर्च्या
Mumbai Municipal Corporation will levy property tax on commercial slums to boost Revenue starting surveys
झोपडपट्यामधील व्यावसायिक गाळेधारक मालमत्ता कराच्या कक्षेत सुमारे ६०० झोपड्यांना पाठवली देयके
ie thinc
IE THINC: ‘तंत्रज्ञान सुलभ आणि परवडणारे झाले पाहिजे’

  हिवाळी अधिवेशन आले की, दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आमदार निवासासह रविभवन, नागभवन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानांच्या सुशोभिकरणावर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. यंदाही त्याला नवे रूप देण्यात आले. मात्र, बहुतांश आमदार हॉटेल, शासकीय विश्रामगृहात मुक्कामाला आहेत.

आमदार निवासाच्या तीन इमारतींमध्ये ३८६ खोल्या आणि ७ सभागृहे आहेत. त्यापैकी ३६६ खोल्या या विधानपरिषद, विधानसभा सदस्यांसाठी आहेत. मात्र, या ३६६ खोल्यांपैकी केवळ ४० खोल्यांमध्ये आमदार थांबले असून, अन्य खोल्यांमध्ये त्यांचे प्रमुख कार्यकर्ते, स्वीय सचिव आणि सुरक्षा रक्षकांचा मुक्काम आहे. आमदार निवासात थांबलेल्या ४० सदस्यांमध्ये २२ महिला आणि १८ पुरुष आहेत.

दिवंगत गणपतराव देशमुख यांचे स्मरण 

नागपुरात अधिवेशन काळात आमदारांना थांबता यावे, म्हणून त्यांच्यासाठी आमदार निवास बांधण्यात आले. त्यात खूप कमी आमदार राहतात. त्याला शेकापचे दिवंगत सदस्य गणपतराव देशमुख यांचा अपवाद होता. ते इमारत क्रमांक ३ मध्ये दुसऱ्या माळय़ावरच्या खोलीत रात असत. तेथून आमदारांसाठी ठेवलेल्या एसटी बसमधून सभागृहात येत आणि बसनेच परत जात. त्यांच्याकडे स्वत:चे वाहनही नव्हते.

आमदार निवासाची आता धर्मशाळा झाली आहे. या ठिकाणी बहुतांश आमदारांचे स्वीय सचिव, सुरक्षा रक्षक किंवा बाहेरगावावरून येणारे कार्यकर्ते राहतात. अशा परिस्थितीत आमदारांना काही खासगी कामे करायची असतील तर त्यासाठी खोल्यांमध्ये स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे आमदार हॉटेल किंवा शासकीय विश्रामगृहात राहतात.

– बच्चू कडू, आमदार

मुक्काम कुठे?

आमदार निवासाच्या तिन्ही इमारतींमध्ये फेरफटका मारला असता इमारत क्रमांक ३ मध्ये खोली क्रमांक ५८ या आमदार नीलय नाईक यांच्या खोलीमध्ये सुरक्षा रक्षक आणि दोन कार्यकर्ते थांबले होते. साहेब हॉटेलमध्ये थांबले, असे सुरक्षा रक्षकाने सांगितले. रणजित पाटील यांच्या खोली क्रमांक ६८ मध्येही कार्यकर्त्यांचा मुक्काम आहे. इमारत क्रमांक २ मधील दुसऱ्या माळय़ावरील खोली क्रमांक २२९ मध्ये संजय गायकवाड, २३२ मध्ये राजकुमार पाटील, खोली क्रमांक २४० वैभव नाईक यांच्यासाठी राखीव आहे. मात्र, या खोल्यांमध्ये त्यांचे कार्यकर्ते दिसून आले. इमारत क्रमांक ३ मध्ये खोली क्रमांक १७१ ही आमदार बच्चू कडू यांच्यासाठी राखीव आहे. त्यांचा मुक्काम जलसंधारण विभागाच्या विश्रामगृहात आहे. त्यांच्या खोलीमध्ये स्वीय सचिव आणि अन्य प्रमुख कार्यकर्ते आहेत. इमारत क्रमांक १ मध्ये दुसऱ्या माळय़ावर महिला आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर शहर जिल्ह्यात एकूण १२ आमदार आहेत. यातील अनेक खोल्यांचे कुलूप अजून उघडलेले नाही. त्यात नागो गाणार, सुनील केदार, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, समीर मेघे यांचा समावेश आहे. अनिल परब यांच्यासाठी इमारत क्रमांक १ मध्ये ११६ क्रमांकाची खोली आरक्षित आहे. मात्र, ते हॉटेलमध्ये थांबले आहेत.

आमदार निवास असे.

  • एकूण आमदारांची संख्या – ३६० (विधानसभा २८८, परिषद -७८)
  • एकूण खोल्या – ३८६
  • आमदारांना वाटप खोल्या- ३६६
  • एकूण कर्मचाऱ्यांची मंजूर पदे – ४१०
  • प्रत्यक्षात काम करणारे – ३०
  • प्रत्यक्षात कंत्राटीवर काम करणारे- १२०

कोटय़वधींचा खर्च कशाला?

आमदार निवासावर कोटय़वधी रुपये खर्च करून रंगरंगोटी करण्यात आली. भोजन कक्षात आकर्षक सजावट करण्यात आली. खोल्यांमध्ये लाखो रुपयांच्या नवनव्या वस्तू खरेदी करण्यात आल्या. फर्निचर बदलण्यात आले. चादरीपासून ते सोफ्याच्या कव्हपर्यंत सर्वच नवीन आणण्यात आले. मात्र, या सुसज्ज अशा खोल्यांमध्ये आमदारच राहत नसतील तर त्यावर खर्च कशाला? असा सवाल केला जात आहे.

Story img Loader