गांधीवाद्यांतील गटबाजी संपुष्टात यावी म्हणून एका अंशी वर्षीय गांधीवाद्याने चक्क गांधीप्रणीत आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष असलेले आबा कांबळे आता एकजूट झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निश्चय ठेवून आहेत.
हेही वाचा >>> पूर्व विदर्भात विषमज्वराच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व सर्व सेवा संघ यावर वर्चस्व मिळवण्यासाठी चंदन पाल व महादेव विद्रोही या दोन ज्येष्ठांत वाद आहेत. त्यातूनच पाल गटाने आशाताई बोथरा यांना तर विद्रोही गटाने आबा कांबळे यांनी अध्यक्ष घोषित करून टाकले. बोथरा या अध्यक्षपद सांभाळत आहेत. कांबळे यांनी दोन्ही गट एकत्र यावे, यासाठी लढा असल्याचे स्पष्ट केले. त्यांची भूमिका मान्यच आहे. त्यासाठी पाच सदस्यीय समिती असून त्यापुढे भूमिका मांडावी, अशी विनंती त्यांना केल्याचे अविनाश काकडे समिती सदस्यांने सांगितले. वैचारिक लढा विचारानेच सोडवावा, अशी गळ त्यांना भेटून घातल्याचे सांगण्यात आले.