नागपूर : समृद्धी महामार्गावर ११ डिसेंबर २०२२ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान वाहनाच्या पुढे अचानक प्राणी आल्यामुळे तब्बल ८३ अपघात झाले. त्यात एकाचा मृत्यू तर २५ जण जखमी झाले, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक महामार्ग (सुरक्षा) डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली.
पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. डॉ. सिंगल म्हणाले, समृद्धीवर ११ डिसेंबर २०२२ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान ७२९ अपघात झाले. त्यापैकी ३३८ अपघातात कुणीही जखमी नाही. ३९१ किरकोळ व गंभीर अपघातात १०१ मृत्यू व ७४८ जखमी झाले. अचानक प्राणी पुढे आल्याने ८३ अपघातांपैकी ६६ मध्ये कुणीही जखमी झाले नाही. ४ अपघातात १ मृत्यू व २५ जण जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


टायर फुटल्याने ०९ अपघात झाले, त्यापैकी ४८ मध्ये कुणीही जखमी नाही. ६१ अपघातात १० मृत्यू तर १४२ जखमी झाले. झोप आल्याने २४२ अपघात झाले. त्यापैकी ११२ मध्ये कुणीही जखमी नाही. १३० अपघातात ४४ मृत्यू तर २५४ जण जखमी झाले. यांत्रिकी दोषामुळे २७ अपघात झाले. त्यापैकी ११ मध्ये कुणीही जखमी नाही. अतिवेगात वाहन चालवल्याने १२८ अपघात झाले. त्यापैकी ४४ मध्ये कुणीही जखमी नाही. ८४ अपघातात ३३ मृत्यू तर १५२ जण जखमी झाले. चुकीच्या पद्धतीने वाहन लावणे वा ब्रेकडाऊनमुळे येथे २२ अपघात झाले. त्यापैकी ६ मध्ये कुणीही जखमी नाही. १६ अपघातात २ मृत्यू तर २२ जण जखमी झाल्याची माहिती सिंगल यांनी दिली. अपघात नियंत्रणासाठी द्वारावर उद्घोषण, ट्रॅव्हल्सची तपासणी, पेट्रोलिंगसह इतरही प्रभावी उपाय सुरू केले असून त्यामुळे वीसहून जास्त दिवसापासून एकही प्राणांतिक अपघात झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

सर्वाधिक मृत्यू रात्री १२ ते ३ दरम्यान

सर्वाधिक अपघाती मृत्यू (१२ अपघातात ४४ मृत्यू) हे रात्री १२ ते रात्री ३ दरम्यान नोंदवले गेले. रात्री ३ ते पहाटे ६ दरम्यान ६ अपघातात ९ मृत्यू झाले. पहाटे ६ ते दुपारी १२ पर्यंत १३ अपघातात २१ मृत्यू झाले. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ पर्यंत ११ अपघातात १७ मृत्यू झाले. रात्री ९ ते रात्री १२ पर्यंत ५ अपघातात १० मृत्यू झाल्याचेही सिंगल यांनी सांगितले.

हेही वाचा : फडणवीसांच्या दौऱ्यात जपानच्या कंपनीला नागपुरात गुंतवणुकीसाठी निमंत्रण, काय झाली चर्चा?

निम्मे अपघाती मृत्यू दुचाकीचालकांचे

राज्यात वर्षभरात १५ हजार २२४ अपघाती मृत्यू झाले. त्यापैकी ७ हजार ७०० मृत्यू हे दुचाकीवरून अपघाताचे आहेत. त्यातही हेल्मेट नसलेल्यांचीच संख्या जास्त आहे. राज्य महामार्ग पोलिसांकडून विविध शासकीय कार्यालयांना हेल्मेट सक्तीसाठीचे पत्र दिले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याचेही सिंगल म्हणाले.

हेही वाचा : यवतमाळ : मित्राला मागितले दहा हजार, त्याने नकार देताच थेट गळयावर फिरवला चाकू….

महामार्ग संमोहनावर उपाय

राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील विविध संस्थांसह व्हीएनआयटीनेही समृद्धीवरील अपघातांवर अभ्यास केला आहे. त्यात महामार्ग संमोहन हेही एक कारण असल्याचे पुढे आले. अपघात कमी करण्यासाठी तेथे वृक्ष लागवड, विविध फलक लावणे सुरू असल्याचे सिंगल यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 83 accidents on samruddhi highway due to animals crossing highway mnb 82 css
Show comments