वाशिम: पावसाचे पाणी इतरत्र वाहून गेल्याने जिल्ह्यात शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची चणचण भासू लागते. मात्र, यावर्षी जिल्ह्यात मृद व जलसंदारण विभागाच्यावतीने सहाही तालुक्यात ८४ कोल्हापुरी बंधारे, गेटेड बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले. यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची सोय होऊन जवळपास २ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासन दरबारी आकांक्षित आणि मागास जिल्हा म्हणून वाशिम ची ओळख आहे. जिल्हा बेसाल्ट खडकावर वसला असून दरवर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस होऊन सुध्दा पाणी टंचाई उद्भवते. बहुतांश नद्यांचा उगम जिल्ह्यातून होती. तसेच जिल्ह्यात मोठे सिंचन प्रकल्प नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात जल संधारणाच्या कामाची नितांत गरज आहे. पडणाऱ्या पावसाचे पाणी रोखणे व वाहणाऱ्या पाण्याला अडविणे हा एक चांगला पर्याय असल्याची बाब समोर ठेऊन मृद् व जल संधारन विभागाच्या वतीने रब्बी हंगाम २०२३-२४ करीता कोल्हापुरी बंधारे व गेटेड बंधारे बांधण्यात आल्याने वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले. यामुळे जिल्ह्यात ४४५० टी एम सी पाणीसाठा उपलब्ध झाला असून जवळपास २ हजार ४० हेक्टर सिंचन क्षमता उपलब्ध होईल, असा अंदाज मृद व जलसंधारणचे कार्यकारी अभियंता अकोसकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा… विधिमंडळावर ११ डिसेंबरला धडकणार शिक्षकांचा मोर्चा, काय आहेत मागण्या? जाणून घ्या…

जिल्ह्यात झालेल्या कोल्हापुरी व गेटेड बंधाऱ्यामुळे मोठया प्रमाणावर शेतीला पाणी उपलब्ध झाले असून बंजर व ओसाड शेती पाण्याखाली आली आहे. तसेच परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिण्याच्या पाण्यासाठी देखील मदत झाली आहे. भविष्यात जल संधारणाच्या कामावर विशेष भर दिल्यास जिल्ह्यातील हजारो हेक्टर वरील क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल, अशी आशा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

अशी बांधण्यात आली बंधारे

तालुकाबंधारेअपेक्षीत सिंचन
वाशिम१७४००
रिसोड३०६००
मालेगाव०८३००
मानोरा१२४१०
मंगरूळपीर१०२१०
कारंजा१२०
एकूण८४२०४० हे.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 84 kolhapuri dams and gated dams were constructed in all six talukas provided irrigation facilities for agriculture and drinking water washim pbk 85 dvr