लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये मागील वर्षभरात सगळ्याच संवर्गातील ग्राहकांना तब्बल ८४ हजार वीज जोडणी देण्यात आल्या आहेत. प्रत्येक महिन्याची आकडेवारी काढल्यास पूर्वीच्या ५ हजार नवीन जोडणीच्या तुलनेत वेग वाढून ७ हजार जोडणीवर गेला आहे.

महावितरणच्या नागपूर परिमंडळात नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांचा समावेश येतो. या परिमंडळात मागील आर्थिक वर्षात ८४ हजार ६७२ नवीन लघुदाब वीजजोडण्या देण्यात आल्या आहे. यापैकी तब्बल ६५ हजार २७ घरगुती, १० हजार ५०७ वाणिज्यिक, १ हजार ३४९ औद्योगिक आणि ५ हजार ५५१ कृषी जोडण्यांचा समावेश आहे. याशिबाय परिमंडळात ४२ ई- वाहनांसाठीही चार्जिंग स्टेशनला वीज जोडणी दिली गेली आहे.

आणखी वाचा-यवतमाळजवळ भोयर घाटात डिझेल टँकर उलटून आग; एक जण ठार, दोघे होरपळले…

‘महावितरण’चे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता यांच्या संकल्पनेतून नागपूर परिमंडळात ‘इज ऑफ़ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार ग्राहकांना नवीन वीज जोडणी तातडीने दिली जात आहे. यापुर्वी महावितरण’च्या नागपूर परिमंडळामध्ये दर वर्षी साठ ते सत्तर हजार वीजजोडण्या दिल्या जात होत्या. परंतु मागील आर्थिक वर्षात नवीन वीजजोडण्या देण्याच्या कामाला नियोजनपूर्वक वेग दिल्याने २०२३- २४ मध्ये ८४ हजार ६७२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

कुक्कुटपालन, यंत्रमाग, शितगृहालाही जोडण्या..

नव्या वीज जोडण्यांसाठी आवश्यक वीजमीटरचा तत्काळ पुरवठ्यासाठी ‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूरचे मुख्य अभियंता दिलीप दोडके नियमितपणे विभागनिहाय आढावा घेतात. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याचा वेग वाढला. कुक्कुटपालन, यंत्रमाग, शितगृह, सार्वजनिक सेवा, सार्वजनिक पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट, तात्पुरत्या धार्मिक आणि इतर वर्गवारीत देखील प्रभावी कामगिरी करीत वर्षभरात तब्बल २ हजार १९६ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या.

आणखी वाचा-यवतमाळात वादळी तांडव, वीज उपकेंद्रावर वीज पडल्याने बत्ती गुल

नागपूर जिल्ह्यातील नवीन वीज जोडण्या (वर्ष २०२३-२४)

संवर्गजोडण्या
घरगुती ५५,८३७
वाणिज्यिक ८,६३३
औद्योगिक१,१०९
कृषी २,९७७
ई- वाहन चार्जिंग३९
इतर १,७८२
एकूण ७०,३७७
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 84 thousand electricity connections have been provided to customers of all categories in last year in nagpur mnb 82 mrj