दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी मेट्रोतून ८३ हजार ८७६ हजार नागरिकांनी प्रवास केला. यापूर्वी २१ सप्टेंबरला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याच्या दिवशी प्रवासी संख्या ८०,७९४ पर्यंत गेली होती. १५ ऑगस्टला ही संख्या ९०,७५८ होती.
हेही वाचा- सावधान ! नरभक्षी सीटी १ वाघ देसाईगंज तालुक्यातील जंगलातच; जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश
दसऱ्याला प्रवाशांची गर्दी बघता रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. एरवी रात्री १० पर्यंत ती धावते. कस्तूरचंद पार्कवर पारंपरिक रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो पाहण्यासाठी अनेकांनी तेथे जाण्यासाठी मेट्रोची निवड केली. कस्तुरचंद पार्क, बर्डी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महामेट्रोकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.