शाळेतून घरी जाताना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने नववीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्विटी सोमनकर(१६ रा.मालेरचक) असे मृत  विद्यार्थिनीचे नाव आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> यवतमाळ : काळी रांगोळी काढून, काळ्या गुढ्या उभारणार! आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना अन्नत्याग आंदोलनातून श्रद्धांजली

अशात चामोर्शी तालुक्यातील मालेरचक गावातील स्विटी सोमनकर ही नववीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी परतताना वाटेतच तिच्या अंगावर वीज कोसळली. आसपासच्या लोकांना लक्षात येताच त्यांनी तिला सुरवातीला जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती अत्यंत खालावल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपरचादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. स्विटीच्या मृत्यूने गावात आणि शाळेत हळहळ व्यक्त होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 class girl student dies of lightning strike in gadchiroli ssp 89 zws