नागपूर: गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारांच्या टोळ्यांकडून पिस्तूलचा वापर वाढला होता. चक्क शहरातून २५ हजार रुपयांत पिस्तूलची विक्री केल्या जात होता. नागपूर शहरात आणि अन्य राज्यात अग्निशस्त्राचा पुरवठा करणाऱ्या आरोपीच्या तहसील पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ९ पिस्तूल आणि ८४ काडतूसे जप्त करण्यात आली. अशी माहिती पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हेगारांच्या मागणीवरून एक पिस्तूल २५ हजार रुपयात विकण्यात येत होती. पिस्तूल तयार करण्याचा कारखाना मध्यप्रदेशात असून नागपूर शिवाय इतरही राज्यात जवळपास १८ पिस्तूल विकल्या आहेत. इम्रान आलम (४३) रा. परासीया (मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याचे नातेवाईक नागपुरात राहात असल्याने तोसुध्दा कळमन्यात राहायला आला. त्याच्या विरूध्द मध्यप्रदेशात विविध गुन्ह्याची नोंद आहे. अनेक वर्षांपासून तो गुन्हे जगतात सक्रीय आहे.

हेही वाचा… नागपूर: भावाच्या मुलीवर बलात्कार करून काका फरार; मुलीची प्रकृती गंभीर

नागपुरात येणे-जाणे असल्याने त्याची ओळख आरोपी फिरोज खान (४०) याच्याशी झाली. फिरोजने त्याच्याकडून पिस्तूल खरेदी केली. नंतर फिरोजच्या माध्यमातून तो गुन्हेगारांच्या मागणीवरुन नागपुरात पिस्तूलचा पुरवठा करीत होता. फिरोजच्या माध्यमातून त्याने मोसीम खान आणि मोनू खान या दोघांनाही पिस्तूल विकल्या. पोलिसांनी आरोपींच्या घराची झाडाझडती घेतली असता फिरोजच्या घरून दोन पिस्तूल, एक देशी कट्टा, इम्रानकडून एक पिस्तूल, परवेज कडून एक पिस्तूल याशिवाय मोसीम आणि मोनूच्या घरून प्रत्येकी दोन पिस्तूल असे ९ पिस्तूल आणि ८४ जिवंत काडतूसे जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात घडलेल्या गेस्ट हाऊसचा संचालक मो. जमिल याच्या हत्येसाठी याच पिस्तूलचा वापर केला. पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद पाटील, शशीकांत मुसळे, सायबरचे उपनिरीक्षक बलराम झाडोकर, पल्लवी गोसावी, संदीप गवळी यांनी केली.

पोलिसांचा तांत्रिक तपासावर भर

जप्त पिस्तूल मध्यप्रदेशातच तयार करून त्याची विक्री विविध राज्यात करण्यात येत होती. अटकेतील गुन्हेगारांशिवाय आणखी कुठे कुठे पिस्तूल विकल्या याचा शोध घेण्यासाठी इम्रान आणि फिरोजच्या मोबाईचा तांत्रिक तपास केला जात आहे. शिवाय मध्यप्रदेशात एक पथक रावाना करण्यात आले आहे. सीडीआरवरून संबधितांची चौकशी केली जात आहे.

सहा आरोपींना शनिवारपर्यंत कोठडी

संपत्तीच्या वादातून मोमीनपुऱ्यातील अल करीम गेस्ट हाउसचे मालक जमील अहमद (५२) याची २५ ऑक्टोबरच्या रात्री गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तहसिल पोलिसांनी गुन्हा नोंदवून मो. सोहेल परवेज रा. मोमीनपुरा, सलमान खान रा. हसनबाग, आशिष बिसेन रा. नंदनवन, फिरोज खान रा. बोरीयापुरा, अदनान खान उर्फ आशू आणि इम्रान आलम रा. परासीया यांना अटक करण्यात आली. सहा आरोपींना ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9 pistols and 84 cartridges were recovered by criminals in nagpur adk 83 dvr
Show comments