वर्धा : भुकेल्या पोटी शेतातील कापूस बोंडे खाणाऱ्या ९२ मेंढ्यांचा हकनाक बळी गेल्याची घटना उजेडात आली आहे. देवळी तालुक्यातील पथरी ते गिरोली रस्त्यावर मोरेश्वर थुल यांच्या शेतालगत ही घटना घडली. या भागात मेंढपाळ आपली जनावरे फिरवीत असतात. काही शेतकरी खतासाठी या मेंढ्या शेतात बसवितात.
हेही वाचा >>> अमरावती जिल्ह्यातील १ हजार ९१४ स्वस्त धान्य दुकानांना टाळे; स्वस्त धान्याचे वितरण ठप्प
काही शेतात कापसावर लाल्या रोगाने थैमान घातलं असल्याने किट नाशकाची फवारणी झाली.मात्र रोगामुळे बोंड फुटत नसल्याने वेचा करणे सोडून देण्यात आले. म्हणून मेंढ्या सोडण्यात आल्या. पण त्या फवारणीचा फटका मेंढ्यांना बसला. विषारी बोंडे खाल्ल्याने बळी गेल्याची शंका व्यक्त होत आहे.मात्र यामुळे मेंढपाळचे आठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतो. ही चूक कोणाची यावर वाद सुरू झाले आहे.