नागपूर : जगातील ९२ टक्के लोकसंख्येला अतिसूक्ष्म धूलिकणांचा(पीएम२.५) त्रास होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या मर्यादेहून अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जास्त आहे. एवढेच नाही तर २०३० पर्यंत त्यात ५० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (यूएनईपी) ने २०२१ मध्ये ‘अॅक्शन ऑन एअर क्वॉलिटी’ हा आपला २०१६चा अहवाल अद्ययावत केला आहे. त्यात विविध देश हवेची गुणवत्ता कशी सुधारू शकतात, यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक प्रदूषण असलेली ठिकाणे दक्षिण आणि पूर्व आशिया, पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका म्हणून ओळखली गेली आहेत. या भागात ‘पीएम२.५’चे प्रमाण उत्तर अमेरिकेच्या तुलनेत आठ ते नऊ पट अधिक असल्याचे आढळले आहे. वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक मृत्यू चीन आणि भारतात नोंदवले जातात. त्यामुळे या प्रभावित भागात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा