बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी ९५ लाख रुपये कमाल खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण पाटील यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. यानुसार उमेदवार, राजकीय पक्ष यांचाकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर संनियंत्रण, परिक्षण करण्याची तयारी करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिनांकापासून विहित नमुन्यात खर्चाशी संबंधित अधिकाऱ्याकड़े दैनंदिन खर्च सादर करावा लागणार आहे. विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी स्थानी निगरानी, भरारी, चलचित्र निगराणी पथके, तैनात करण्यात आली आहे. ही पथके राजकीय सभा, रॅली सारख्या कार्यक्रमावर नजर ठेवणार असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…“या देशाला काँग्रेसने नव्हे भाजपनेच लुटले”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. ६ विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात येणार आहेत. निवडणूक खर्चाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची पडताळणी करण्यात येणार आहे.