नागपूर : महाराष्ट्रात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर अपघात व मृत्यूंची संख्या जास्त आहे. याशिवाय गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात मोटार, व्हॅन अशा वाहनांच्या अपघातांमध्ये सर्वाधिक म्हणजे ९ हजार ५७२ मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) मुंबई कार्यालयाच्या माहितीनुसार, राज्यात २०१७ ते २०२१ या काळात मोटार, व्हॅन या वाहनांचे सर्वाधिक २७ हजार ८१८ अपघात झाले. त्यात ९ हजार ६७२ नागरिकांचा मृत्यू झाला. ट्रक, टिप्पर अशा प्रकारच्या वाहनांतून १३ हजार १५६ अपघातांत ५ हजार ३२० मृत्यू झाले. बसगाडी श्रेणीतील वाहनांच्या ५ हजार ३७० अपघातांत १ हजार ५९५ मृत्यू झाले.

 महाराष्ट्रात राज्य आणि राष्ट्रीय असे दोन वेगवेगळे महामार्ग आहेत. त्यातील राज्य महामार्गावर १ जानेवारी २०१७ ते ३० जुलै २०२२ दरम्यान ३९ हजार ५३२ अपघातांत १९ हजार १६९ मृत्यू झाले. राष्ट्रीय महामार्गावर ४६ हजार ३७७ अपघातांत २१ हजार ९७४ मृत्यू झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती मिळाली आहे.

राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या एकत्रित केल्यास राज्यात १ जानेवारी २०१७ ते ३० जुलै २०२२ दरम्यान एकूण ८५ हजार ९०९ अपघातांत ४१ हजार १४३ मृत्यू झाले.

राष्ट्रीय महामार्ग

 वर्ष          अपघात       मृत्यू

 २०१७       ९,२३७       ३,६३७

 २०१८       ९,३५५       ४,०८८

 २०१९        ८,३६०       ३,७९९

 २०२०        ६,५०१       ३,५२८

 २०२१       ७,५०१       ४,०८०

 २०२२ जुलै     ५,४२३       २,८४२

राज्य महामार्ग

वर्ष           अपघात       मृत्यू

 २०१७       ८,५०८        ३,६२२

 २०१८        ७,७५५        ३,४४६

 २०१९       ७,२१४       ३,३४४

 २०२०        ५,५१८        २,९७१

 २०२१       ६,३२८       ३,४११

 २०२२ जुलै   ४,२०९        २,३७५

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9572 deaths in motor and van accident in maharashtra in five years zws