लोकसत्ता टीम
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि पुणे -नागपूर- पुणे यादरम्यान उन्हाळी विशेष ९८ रेल्वेगाड्या सुरू करण्यात येत आहेत.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे, नागपूर विभागाने मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या प्रवाशांसाठी अतिरिक्त प्रवास सुविधा पुरवतील तसेच उन्हाळी गर्दी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतील. गाडी क्रमांक ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – नागपूर विशेष एक्सप्रेस मुंबईहून ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि रविवार रात्री १२.२० वाजता सुटेल आणि नागपूर आगमन दुपारी ३.३० वाजता होईल.
गाडी क्रमांक ०२१४० नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष एक्सप्रेस नागपूरहून ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि रविवारला रात्री आठ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आगमन दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता होईल. गाडी क्रमांक ०१४६९ पुणे- नागपूर विशेष एक्सप्रेस पुण्याहून ८ एप्रिल ते २४ जून पर्यंत आठवड्यातून एक दिवस मंगळवारला दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर आगमन सकाळी ६.३० वाजता होईल.
गाडी क्रमांक ०१४६९ नागपूर-पुणे विशेष एक्सप्रेस नागपूरहून ९ एप्रिल ते २५ जूनपर्यंत आठवड्यातून एक दिवस बुधवारला सकाळी ८ वाजता सुटेल आणि नागपूर आगमन त्याच दिवशी रात्री ११. ३० वाजता होईल. गाडी क्रमांक ०१४६७ पुणे- नागपूर विशेष एक्सप्रेस पुण्याहून ९ एप्रिल ते २५ जून पर्यंत आठवड्यातून एक दिवस बुधवारला दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि नागपूर आगमन दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता होईल. गाडी क्रमांक ०१४६८ नागपूर-पुणे विशेष एक्सप्रेस नागपूरहून १० एप्रिल ते २६ जून पर्यंत आठवड्यातून एक दिवस, गुरुवारला सकाळी ८ वाजता सुटेल आणि नागपूर आगमन त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता होईल.