नागपूर : विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पार पडावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहर पोलिसांनी ‘विशेष तडीपार मोहीम’ राबविली. या मोहिमेत तब्बल ९९ आरोपींना शहरातून तडीपार करण्यात आले. गेल्या १० वर्षातील सर्वात मोठी कारवाई असून यामुळे अनेक गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे.

येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक आहे. मतदानाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. शहरातील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला असून एकाच दिवसात तब्बल ९९ गुन्हेगारांना शहरातून तडीपार केले आहे. यासोबतच १ हजार ६७९ आरोपी संशयाच्या कक्षेत असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील ५२० आरोपींना न्यायालयाकडून आलेले अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. एमपीडीए कायद्याअंतर्गत ७ आरोपींना मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले. तसेच शहरातील अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण व्हावा, यासाठी पोलिसांनी एका आठवड्यात ४९० ठिकाणी छापे घालून ११ लाख ७५ हजार रुपये किंमतीची दारु जप्त केली तसेच ५२८ आरोपींना अटक करुन गुन्हे दाखल केले.

traffic congestion, Parking problem APMC navi mumbai double parking, trucks
एपीएमसीतील पार्किंग समस्या जटिल, ट्रकच्या दुहेरी पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
brigadier Sudhir sawant
शिवसेना (शिंदे गट) नेते माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी बांधले शिवबंधन
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर
Uddhav Thackeray Balapur, Uddhav Thackeray Criticize BJP, Balapur,
‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात

हेही वाचा >>>“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

शहरात चाकू, तलवारी आणि पिस्तूल वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान वाढता धोका लक्षात घेता भारतीय शस्त्र कायद्याअंतर्गत कारवाई करीत १२७ आरोपींकडून शस्त्र जप्त करुन अटक करण्यात आली. शहरात ड्रग्स, गांजासह अन्य अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून ते आजपर्यंत ३२ ठिकाणी छापे घालून ४८ आरोपींना अटक करुन कारागृहात रवानगी केली. शहरात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूची विक्री आणि सेवन वाढले होते. त्यामुळे पोलिसांनी तब्बल ३२ ठिकाणी छापे घालून ४८ आरोपींवर गुन्हे दाखल केले. तसेच १५ लाख ४८ हजार रुपयांचा गुटखा-तंबाखू जप्त केला. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी ४५ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम अवैधरित्या वाहतूक करताना जप्त केली.

पोलिसांचे अभियान आणि गुन्हेगारांची पळापळ‌ 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी विविध अभियान राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शस्त्र वापरणाऱ्या गुन्हेगारांची धरपकड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांची ‘परेड’ घेण्यात आली. त्यानंतर  पोलिसांचा वचक निर्माण करण्यासाठी कुख्यात गुन्हेगारांना मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले तर शस्त्राचा वापर करणाऱ्यांवर लगेच गुन्हे दाखल करुन अटक करण्याची कारवाई करण्यात आली.