नागपूर : पारडी परिसरात खेळता-खेळता १० महिन्यांचा मुलगा बादलीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. १० ऑगस्टच्या दुपारी ही घटना घडली. अनय संदीप परतेती (१० महिने) असे दगावलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील संदीप परतेती हे सद्गुरू नगर, गोपाल हटवार यांच्या घरी भाड्याने राहतात. गुरुवारी दुपारी तो घरात खेळत होता.
नेहमी प्रमाणे तो घरात रंगात होता. खेळता- खेळता तो पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. हा प्रकार काही वेळाने घरच्यांच्या निदर्शनात आल्यावर खळबळ उडाली. तातडीने मुलाला बादलीतून काढून रुग्णालय गाठले. येथील डॉक्टरांकडून मुलाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु मध्यरात्री मुलाचा मृत्यू झाला.