नागपूर: कामठीतील दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकून केसासकट त्वचाही निघाली. मेडिकलच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार घेणारी ही मुलगी आता नैसर्गिक केसाला कायमची मुकणार असल्याचे पुढे येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामठीतील वैष्णवदेवीनगर परिसरात घराजवळ खेळताना एका १० वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकले होते. त्वचा निघाल्याने तिला गंभीर अवस्थेत मेडिकल रुग्णालयाशी संलग्नित ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले गेले. येथे प्लास्टिक सर्जरी विभागाकडून तपासणी केली असता उशीर झाल्याने त्वचा पुन्हा जोडणे शक्य नसल्याचे पुढे आले.

हेही वाचा… खेळतांना दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकले, पुढे झाले असे की…

मुलीची प्रकृती स्थिर असून काही दिवसांनी तिच्या मांडीची त्वचा लावण्याबाबत नियोजन करण्याचे संकेत डॉक्टरांकडून मिळत आहेत. परंतु मुलीची सध्याची स्थिती बघता तिला नैसर्गिक केस येण्याची शक्यता नसल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. ट्रामा केअर सेंटरमधील सगळेच डॉक्टर, परिचारिकांसह इतरही कर्मचारी मुलीकडे विशेष लक्ष देत आहेत.