सोमवारी सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास चिमूर तालुक्यातील शंकरपूर – भिसी मार्गांवर आंबोली गावापासून एक किमी अंतरावर नहरात वाळूने भरलेल्या १२ चाकी हायवाचा भीषण अपघात झाला. पुलावरून गाडी नाल्यात कोसळली. त्यात चालक व मदतनिसाचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये वाहन चालक दीपक इंद्रा दीप (३०) व मदतनीस प्रताप शिवकुमार राऊत (२८) यांचा समावेश आहे. दोघेही मृतक नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सुरगाव येथील रहिवासी आहेत.

हेही वाचा >>>विखे पाटील यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले, “सत्तेसाठी हिंदुत्वाशी फारकत घेणाऱ्यांनी..”

Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
fog shocking accident video
कडाक्याची थंडी, दाट धुकं अन् भयंकर अपघात! एकमेकांवर आदळल्या अनेक गाड्या; धडकी भरवणारा VIDEO VIRAL
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Traffic congestion persists despite 33 bridges in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ३३ पूल; वाहतूककोंडी मात्र कायम
Bhayandar, laborer died, suffocation , sewage tank,
भाईंदर : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून एका कामगाराचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृतकांच्या शवांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून प्रक्रिया पूर्ण होताच नातेवाईकांकडे मृतकांचे शव सोपविण्यात येतील. चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे त्याचे गाडीवरून नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात स्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. भिसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरपूर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक चांदे पुढील तपास करीत आहेत.

Story img Loader