उपराजधानीत सोमवारी क्वार्टर परिसरात एक १२ वर्षीय मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळला. या संशयास्पद मृत्यू प्रकरणात खेळता खेळता मुलाला गळफास लागल्याचा अंदाज व्यक्त होत असला, तरी तपासानंतरच मुलाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – विदर्भातील शेतकरी पुत्राचा ब्रिटनमध्ये सन्मान

हेही वाचा – “सत्तेत आल्यावर वीजबिल माफीचा विसर”, नाना पटोलेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका

अग्रण्य सचिन बारापात्रे (१२) रा. सोमवारी क्वार्टर, नागपूर असे दगावलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील सचिन हे इलेक्ट्रिक फिटिंगची कामे करतात. बारापात्रे कुटुंब सोमवारी क्वार्टर परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. या घरापुढे चिखले यांचे घर आहे. ते बारापात्रे यांच्या घरमालकाचे नातेवाईक आहेत. अग्रण्य नेहमीच चिखले यांच्या घरातील छतावर जाऊन खेळत होता. तो २५ जानेवारीच्या संध्याकाळीही खेळायला गेला. बराच वेळ मुलगा घरी परतला नाही. घरच्यांनी शोध घेतला असता नायलाॅनच्या ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत तो दिसला. त्याला जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. प्राथमिक तपासात अग्रण्यला ओढणीने खेळताना गळफास लागला असेल, असा पोलिसांचा अंदाज आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 12 year old boy found in hanged condition in nagpur mand 82 ssb