नागपूर : व्यसनाधीन वडिलांचे मुलाकडे होणारे दुर्लक्ष आणि घरातील कुटुंबाचे चोवीस तास ताण-तणावाचे वातावरण यामुळे १५ वर्षीय मुलगा नैराश्यात गेला. नैराश्य घालविण्यासाठी तो दारू-सिगारेटच्या आहारी गेला. त्या मुलाने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. विनय अमित मसराम (१५, पांढराबोडी) असे मृत मुलाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय अमित मसराम (१५, पांढराबोडी) असे मृतकाचे नाव आहे. विनयचे वडिल अमित मसराम हे पेंटिंगची कामे करतात, तर आई मोलमजुरी करते. अमित यांना दारूचे व्यसन आहे. त्यामुळे ते रोज दारू पिऊन घरी पत्नी व मुलांना मारहाण करायचे. दारुड्या पतीसोबत पत्नीचे रोजच वाद व्हायचे. अमित यांना एक मुलगा व मुलगी होती. घरात नेहमी ताण-तणावाचे वातावरण होते. मुलगा विनय हा नववीत होता. त्याच्या मोठ्या बहिणीने मागील वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर तो बराच नैराश्यात गेला. त्यातच त्याच्या आईवडिलांचे सतत विविध कारणांवरून भांडण होत होते. महिन्याभरापूर्वी त्याची आई घर सोडून माहेरी निघून गेली. विनयला सोबत येण्यासाठी तिने विनवणी केली, मात्र तो आला नाही.

हेही वाचा – अकोला : कृषी विभागाच्या योजनांसंदर्भात समाजमाध्यमांवर अफवांचे पीक

बहिणीच्या मृत्यूचे दुःख आणि आई सोडून गेल्यामुळे तो नैराश्यात गेला. त्याला दारू आणि सिगारेटचे व्यसन जळले. सोमवारी दुपारच्या सुमारास त्याचे वडील कामावर गेले होते. घरी कुणीच नसताना विनयने लाकडी बल्लीला चादरीने गळफास घेतला. त्याचे वडील सायंकाळी घरी आले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. अंबाझरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 15 year old boy ended his life due to depression in nagpur district adk 83 ssb
Show comments