अकोला : एका २४ वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ‘झूठा प्यार था तेरा’ असा संदेश समाज – माध्यमांवर ठेवत त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. अक्षय गणेश शिरसाट (रा.बाभूळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
बाभूळगाव येथील रहिवासी असलेल्या अक्षय गणेश शिरसाट याने यावलखेड रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेसमोर उडी घेऊन आपले जीवन संपवले. अक्षयच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
अक्षयने बुधवारी रात्री १२ वाजून ३२ मिनिटांनी ‘झूठा प्यार था तेरा’ असे समाजमाध्यमावर ‘स्टेटस’ ठेवले होते. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वाेपचार रुग्णालयात पाठवला. पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे. पुढीत तपास पोलीस करीत आहेत.