शहरातील मोठी उमरी परिसरात राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीच्या पाठीवर आजीला जखमा दिसल्या. आजीने कारण विचारताच मुलीने सांगितलेल्या घटनाक्रमाने सर्वांनाच धक्का बसला.२६ वर्षीय विवाहित युवकाने १५ दिवसांपूर्वी बळजबरीने मुलीवर दुष्कर्म केले. याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आकाश रामचवरे, असे नराधम आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>बुलढाणा: दुसऱ्या टप्प्यात वाढली ‘पदवीधर’च्या मतदानाची गती; आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी पहिल्याच टप्पात केले मतदान

मोठी उमरी भागात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीबरोबर १५ जानेवारीला रात्री रस्त्याने घरी जात असताना तिच्याच ओळखीतील एक २६ वर्षीय तरुण तिथे आला. घरी सोडून देण्याचा बहाण्याने तिला सोबत नेले. उमरीतील स्मशानभूमिच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर आरोपीने बलात्कार केला. आरोपीने अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांसह ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने भीतीपोटी हा प्रकार कुणाला सांगितला नाही. मुलीच्या अंगावर तसेच पाठीवर जखमा दिसून आल्या. यासंदर्भात तिच्या आजीने तिला विचारणा केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी भादंवि कलम ३७६, ३५४ सह बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली आहे.दरम्यान, गत महिन्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा आता ही घटना समोर आल्याने अकोला शहर हादरले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 26 year old married youth forcibly raped a girl ppd 88 amy