नागपूर : उपराजधानीत पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. कामठीत तिसरीच्या विद्यार्थिनीवर एका ५० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला तर अजनीत वैधमापन विभागातील उपनियंत्रक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने एका महिलेशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला.

पहिल्या घटनेत, तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून ५० वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. ती रडायला लागल्यानंतर तिला चाकूचा धाक दाखवून गप्प केले. मुलीने पळतच घर गाठले आणि आईला घडलेला प्रसंग सांगितला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी तक्रारीवरुन आरोपी आदेश वासनिक (५०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.

rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण

राज्यातील महिलाच नव्हे तर चिमुकल्या मुलीही सुरक्षित नसल्याचे चित्र अवघ्या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे.  राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. सध्या राज्यभर बदलापूर येथील एका शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राज्यभरात विविध संघटना आणि संस्था ठिकठिकाणी आंदोलने करीत आहेत. अशातच कामठी परीसरातील आठ वर्षाच्या मुलीला आदेश वासनिक या नराधमाने मंगळवारी रात्री आठ वाजता चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवले.

हेही वाचा >>>“लोकसभेत महाविकास आघाडीला कौल, कारण…” काय म्हणाले राज ठाकरे?

 चॉकलेटच्या आमिषाने ती मुलगी त्याच्याजवळ गेली. त्याने घरात चॉकलेट असल्याचे सांगून आतमध्ये नेले. तेथे त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती मुलगी भेदरली. तिने रडण्यास सुरुवात केली. त्यामुळे आदेशने चाकूचा धाक दाखवला. ‘तू जर कुणालाही काही सांगितले तर जीवे मारणार’ अशी धमकी दिली. त्यामुळे तिने लगेच घराकडे पळ काढला.

घडलेला प्रसंग तिने आईला सांगितला. आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने शेजाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यानंतर चिमुकलीसह आई कामठी पोलीस ठाण्यात गेली. तक्रारीवरून ठाणेदार प्रशांत जुमडे यांनी लगेच गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली.

हेही वाचा >>>“विधानसभा निवडणूक गांभीर्याने घ्या,” राष्ट्रीय संघटन सचिवांची भाजप नेत्यांना तंबी

दुसऱ्या घटनेत, वैधमापन विभागातील उपनियंत्रक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने एका महिलेशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला. त्या अधिकाऱ्याच्याविरुद्ध अजनी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. विजय झोटे (५७) असे आरोपी उपनियंत्रकाचे नाव आहे. तक्रारदार महिलेचे पती वजनमापे दुरुस्ती व मशिन्स उत्पादनाचे काम करतात.

नवीन वजनमापे पडताळणीसाठी त्यांनी शासकीय शुल्क भरले होते. त्यांनी तसा ऑनलाईन अर्जदेखील केला होता. ७ ऑगस्ट रोजी विजय झोटेने महिलेच्या पतीचा फोनवर अपमान केला. त्यामुळे ते तणावात होते. ८ ऑगस्टला झोटे व दोन सहकारी महिलेच्या घरी पोहोचले. महिलेने झोटेने केलेल्या अपमानामुळे पती तणावात असल्याची बाब सांगितली. यावरून झोटेने काम न करण्याची धमकी दिली. झोटेने महिलेच्या पतीचा हात धरत त्यांच्या कार्यशाळेतून बाहेर ओढत नेले. महिलेने त्याला विरोध केला असता त्या महिलेचा देखील हात पकडत ओढले आणि अश्लील चाळे केले. महिला ओरडल्यानंतरही झोटेने तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे हादरलेल्या महिलेने अजनी पोलीस ठाण्यात त्याच दिवशी तक्रार केली होती.

मात्र, तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून गुन्हा नोंदवितो, अशी भूमिका घेतली. शासकीय अधिकारी असल्यामुळे झोटेविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलेची बाजू लावून धरली. त्यामुळे अजनी पोलिसांनी झोटेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.